झिंग झिंग झिंगाटवर थिरकली तरुणाई!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

प्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार स्वरूप भालवणकर यांच्या बाहरदार गीतांचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी प्रमिलाताई आेक सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

अकोला - सांजवेळ...स्थळ प्रमीलाताई अोक सभागृह...रसिकांच्या गर्दीने भरगच्च भरलेले... त्यात ‘झिंग झिंग झिंगाट’ हे गाणे कानी पडल्यावर तरूणाई थिरकली नाही तरच नवल... प्रसिद्ध गीतकार, संगीतकार स्वरूप भालणकर यांच्या सुमधूर गाण्यांच्या ‘स्वरझंकार’ या ‘सकाळ’ वऱ्हाड आवृत्तीच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शनिवारी(ता.८) आयोजित कार्यक्रमाला अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.   

प्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार स्वरूप भालवणकर यांच्या बाहरदार गीतांचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी प्रमिलाताई आेक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सकाळ वऱ्हाड आवृत्तीच्या तिसऱ्या वर्धापनदिनी आयोजित या बहारदार गीत-संगीताच्या कार्यक्रमाचा श्रीगणेशा प्रसिद्ध नृत्यांगणा नैना जाधव यांनी गणेश वंदना सादर करून केला. पहिल्याच गीताला कलावंतांना उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यानंतर प्रज्योत देशमुख, पल्लवी राऊत, रोशन वाटके यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. मैफल रंगात येत असतानाच रंगमंचावर मुख्य गायक स्वरूप भालवणकर यांची एंट्री झाली आणि सभागृहात उपस्थित प्रेक्षकांना टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांचे स्वागत केले.

भालवणकर यांनीही बुद्धीची देवता गणरायाला वंदन करता ‘देवा तुझ्या दारी आलो...’ या गीताचे सूर आवळत रसिकांना मैफिलीतील पुढील रंगतदार गीतांची चाहूल करून दिली. त्यांचे एक-एक गीत रसिकांच्या दिलावर राज्य करीत होते. रॉक बॅन्ड..., दूर जब दिन ढल जाये..., तुला लागली कुणाची हिचकी..., ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ..., हिल पोरी हिला तुझ्या कपाळीला टिळा..., मला लगीन कराचंय..., यासारखी एकापेक्षा एक सरस गीत ते सादर करीत असलताना अकोलेकर रसिकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला त्यांच्या प्रत्येक गाण्यावर तरुणाई थिरकत होती.

तरुणांच्या दिलावर राज्य करणाऱ्या ‘झिंग झिंग झिंगाट...’ या गाण्याला सुरुवात झाली आणि प्रेक्षकांनी सभागृह डोक्यावर घेतले.  रसिकांचा उदंड प्रतिसाद बघून गायक भालवणकर यांनाही रंगमंचावरून खाली येत प्रेक्षकांमध्ये जाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी विविध रॅप गाणी सादर करीत प्रेक्षकांनाही गाणे म्हणण्यासाठी प्रोत्साहित केले. कलावंतांचा उत्साह बघून काही प्रेक्षकांनाही त्यांची गाण्याची हौश भागवून घेतली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ.प्रवीण देशमुख यांनी केले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News