कळंबमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या ८७ वर्गखोल्या धोकादायक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • पावसाळा तोंडावर येऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष

कळंब - एकीकडे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य शासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, तालुक्‍यातील ३० जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या ८७ वर्गखोल्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यांमध्ये जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्राला काही दिवस उरले आहेत. त्याबरोबरच पावसाळा तोंडावर आला आहे. तरीही वर्गखोल्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या १४२ शाळा आहेत. यापैकी ३० शाळांतील ८७ वर्गखोल्या धोकादायक आहेत. यातील अनेक वर्गखोल्यांना पावसाळ्यात गळती लागते, तर काही वर्ग खोल्यांच्या भिंतीला तडे गेले आहेत. याबाबतची माहिती शाळांच्या मुख्याध्यापक, संबंधित शाखा अभियंता यांनी वारंवार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिली आहे. याशिवाय वारंवार होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीतही माहिती देण्यात आली आहे. स्पर्धेच्या काळात जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. डिजिटल शाळा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र असे विविध प्रायोगिक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा या शाळांना नक्कीच फायदा झाला. डिजिटलमुळे शाळांचे रूपडे पालटले आहे.

तालुक्‍यातील अनेक जिल्हा परिषद शाळांचे बांधकाम बरेच जुने आहे. भेगाळलेल्या भिंती व छतामधून पाण्याची गळती होत असल्याने पावसाळ्यात ज्ञानार्जन सोडून विद्यार्थ्यांना आपली पाठ्यपुस्तके ओली होण्यापासून वाचविण्यासाठी धावपळ करावी लागते. वादळी वारे, मुसळधार पाऊस आल्यास ‘आला पावसाळा अन, जीव संभाळा’ अशी स्थिती निर्माण होत आहे. शहरातील नगरपालिकेच्या शाळांची मोठी वाताहात झाली आहे. शाळेतील सात वर्गखोल्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागते. कळंब, ता. ४ (बातमीदार) ः एकीकडे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य शासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, तालुक्‍यातील ३० जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या ८७ वर्गखोल्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यांमध्ये जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्राला काही दिवस उरले आहेत. त्याबरोबरच पावसाळा तोंडावर आला आहे. तरीही वर्गखोल्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या १४२ शाळा आहेत. यापैकी ३० शाळांतील ८७ वर्गखोल्या धोकादायक आहेत. यातील अनेक वर्गखोल्यांना पावसाळ्यात गळती लागते, तर काही वर्ग खोल्यांच्या भिंतीला तडे गेले आहेत. याबाबतची माहिती शाळांच्या मुख्याध्यापक, संबंधित शाखा अभियंता यांनी वारंवार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिली आहे. याशिवाय वारंवार होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीतही माहिती देण्यात आली आहे. स्पर्धेच्या काळात जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. डिजिटल शाळा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र असे विविध प्रायोगिक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा या शाळांना नक्कीच फायदा झाला.

डिजिटलमुळे शाळांचे रूपडे पालटले आहे. तालुक्‍यातील अनेक जिल्हा परिषद शाळांचे बांधकाम बरेच जुने आहे. भेगाळलेल्या भिंती व छतामधून पाण्याची गळती होत असल्याने पावसाळ्यात ज्ञानार्जन सोडून विद्यार्थ्यांना आपली पाठ्यपुस्तके ओली होण्यापासून वाचविण्यासाठी धावपळ करावी लागते. वादळी वारे, मुसळधार पाऊस आल्यास ‘आला पावसाळा अन, जीव संभाळा’ अशी स्थिती निर्माण होत आहे. शहरातील नगरपालिकेच्या शाळांची मोठी वाताहात झाली आहे. शाळेतील सात वर्गखोल्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News