या मराठी अभिनेत्रीवर युवराज सिंग झाला फिदा !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 January 2020

मात्र, ही अभिनेत्री अभिनयाइतकीच खेळातही हुशार आहे. ही अभिनेत्री दुसरी कुणी नसून सैयामी खेर होय. सैयामीचे क्रिकेटप्रेम सर्वश्रुत आहे. फक्त क्रिकेटच नाही, तर टेनिस आणि इतर खेळांबद्दलही ती अनेक पोस्ट तिच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करत असते. 

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'माऊली' या मराठी चित्रपटातून सैयामीने मराठी चित्रपटात पदार्पण केले. बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं तसं बरंच गहिरं आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी विवाह केल्याचे आपणाला माहीत आहे. पण, बॉलिवूडमधील ब्युटींना कितपत क्रिकेट खेळता येते याची माहिती मात्र कोणालाच नाही. 

मात्र, याला एक अभिनेत्री अपवाद ठरली आहे. स्पोर्ट विषयावरील बायोपिकसाठी अनेक अभिनेते-अभिनेत्री खेळांचे प्रशिक्षण घेतात. मात्र, ही अभिनेत्री अभिनयाइतकीच खेळातही हुशार आहे. ही अभिनेत्री दुसरी कुणी नसून सैयामी खेर होय. सैयामीचे क्रिकेटप्रेम सर्वश्रुत आहे. फक्त क्रिकेटच नाही, तर टेनिस आणि इतर खेळांबद्दलही ती अनेक पोस्ट तिच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करत असते. 

सैयामीने काल एक व्हिडिओ अपलोड केल्याने ती चांगली क्रिकेटपटू असल्याचे दिसून आले. या व्हिडिओवर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने प्रतिक्रिया नोंदवली आहे. शॉट बडी! असे म्हणत सैयामीच्या खेळाचे कौतुकही त्याने केले आहे. 
मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजच्या क्रिकेट टीममध्येही सैयामी खेळली आहे. तसेच महाराष्ट्राच्या महिला टीमतर्फेही ती क्रिकेट खेळली आहे.

पुढे तिने अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. मात्र, खेळावरील प्रेम तिचं काही कमी झालं नाही. तिला क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस हे खेळही आवडतात. सैयामीने ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायनाशी दोन हात केले होते. त्यानंतर सायना आणि सैयामी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या. याआधी सैयामीने गोलंदाजीतही आपले कौशल्य आजमावले होते.

त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. सैयामीने फलंदाजी करत असतानाचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्याला पसंती दर्शवली आहे. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'माऊली' या मराठी चित्रपटातून सैयामीने मराठी चित्रपटात पदार्पण केले. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचा रोल तिने साकारला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News