विद्यापीठाच्या रक्तदान शिबिराला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 May 2020

शंकर नारायण कला व वाणिज्य महाविद्यालय, भाईंदर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मुंबई : कोरोनाच्या संकटात रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यामुळे रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने रक्तदान वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विविध महाविद्यालयांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांना करण्यात आले होते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत 5 विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शंकर नारायण कला व वाणिज्य महाविद्यालय, भाईंदर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मुंबई शहराचे राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सतीश कोलते यांनी स्वतःच्या इमारतीत शिबिर आयोजित केले आणि त्यात 24 जणांनी सहभाग नोंदवला.

एम. एल. डहाणूकर महाविद्यालयांमध्ये आजी व माजी रा.से.यो. स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये 50 जणांनी रक्तदान केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा (जि. रत्नागिरी) येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये लांज्याचे पोलिस निरीक्षक संजय चौधर यांनी स्वत: रक्तदान केले. लाला लजपतराय महाविद्यालय, महालक्ष्मी यांच्या रा.से.यो. स्वयंसेवकाने आयोजित केलेल्या शिबिरासाठी रक्तपेढीची व्हॅन प्रत्येक रक्तदात्याच्या घरी जाऊन रक्त गोळा केले. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक निसर्ग दळवी याने स्वत:तर रक्तदान केलेच; पण त्याच्या आईनेसुद्धा रक्तदान केल्याचे राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा. सुधीर पुराणिक यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News