कोरोनामुळे सार्वजनिक गणपती न बसवण्याचा तरूणांचा निर्णय

महेश घोलप
Saturday, 22 August 2020

कोरोनामुळे सार्वजनिक गणपती न बसवण्याचा तरूणांचा निर्णय

कोरोनामुळे सार्वजनिक गणपती न बसवण्याचा तरूणांचा निर्णय

सांगली - गणेश चतुर्थीला आपल्याकडे घरी गणरायाचं आगमन होतं, त्याचबरोबर मंडळांच्या मुर्तीचंही आजचं आगमन होतं. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळांनी मुर्ती न बसवण्याचा निर्णय तरूणांनी घेतला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारची नियमावली पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली जिल्हातील ३२ शिराळा तालुक्यात गणपतीच्या आगमनाला मुंबईत नोकरीसाठी सर्वजण एकत्र येतात. परंतु कोरोनामुळे मार्चमध्ये आलेला तरूण अजून मुंबईला परतलेला नाही. तसेच शिराळा तालुक्यात काल २३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. आरोग्याचा विचार करत मंडळांनी सार्वजनिक गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

गावाकडं सार्वजनिक गणपती बसवल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होते. त्याचबरोबर अनेकजण बाहेरून दर्शनासाठी येत असतात अशी नवतरूण मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय नायकवडी यांनी दिल्ली. तसेच कोरोनाच्या काळात लोकांनी स्वत :ची काळजी घ्यावी असं आवाहनही मंडळाकडून करण्यात आलं आहे.

चरण गावातील गणेश मंदिरात फार पुर्वीपासून व्यापारी वर्गाकडून गणेश मुर्ती बसवली जात होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गर्दी होऊ नये, या कारणामुळे आम्ही व्यापारी वर्गाकडून गणपती न बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं सचिन पाटील यांनी सांगितलं.

यंदा गणपतीची पिढ्यानपिढ्या सुरू असलेली परंपरा खंडीत झाली आहे, पण कोरोनामुळे आरोग्य धोक्यात येईल असं वागू नका असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गणपती न बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. - निलेश पाटील

कोरोनाचा अधिक संसर्ग आता गावाकडं होऊ लागला आहे. त्यामुळे गावक-यांकडून हा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणपती न बसवण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो- शेखर पाटील

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News