तरुणींचं गर्भनिरोधक गोळ्या खाण्याचं प्रमाण वाढलं, 'या' आजाराने त्रस्त

यिनबझ टीम
Saturday, 22 February 2020

आपल्या देशात आजही गर्भनिरोधकाची जबाबदारी महिलांकडे असल्याचे मानले जाते आणि यामुळेच अवांछित गर्भधारणा टाळण्यासाठी मोठ्या संख्येने महिला दररोज गर्भनिरोधक गोळ्या वापरतात. परंतु या गोळ्यांचे बरेच दुष्परिणाम देखील आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

आपल्या देशात आजही गर्भनिरोधकाची जबाबदारी महिलांकडे असल्याचे मानले जाते आणि यामुळेच अवांछित गर्भधारणा टाळण्यासाठी मोठ्या संख्येने महिला दररोज गर्भनिरोधक गोळ्या वापरतात. परंतु या गोळ्यांचे बरेच दुष्परिणाम देखील आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

बर्थ कंट्रोल किंवा गर्भनिरोधक गोळी घेतल्यास महिलांच्या शरीरातील ओव्हुलेशन्स थांबते. जेव्हा ओव्हुलेशन्स  होणार नाही, तेव्हा अंडबीजही तयार होणार नाहीत आणि जेव्हा अंडबीज तयार होणार नाही, तेव्हा शुक्राणूंचं मिश्रण (फर्टिलाइजेशन) होण्याचा कोणताही धोका नसतो, म्हणजेच गरोदरपणाचा कोणताही धोका उद्भवणार नाही.

हे सगळं थांबवणाऱ्या गोळ्यांना गर्भनिरोधक (ओरल कॉन्ट्रसेप्टिव) देखील म्हटले जाते आणि गर्भधारणा रोखण्याची हार्मोन-आधारित पद्धत म्हटली जाते. केवळ गर्भधारणा रोखण्यासाठीच नाही तर मासिक पाळी नियमित यावी यासाठी, मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या अत्याधिक वेदनांच्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी आणि प्रीमॅन्स्ट्रूअल सिंड्रोमचा त्रास कमी करण्यासाठी या गोळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय.

जर या गोळ्या योग्य प्रकारे वापरल्या तर खूप प्रभावी ठरतात. मात्र एक लक्षात असू द्या या गोळ्या फक्त गर्भ निरोधक म्हणून काम करतील तुमच्या शरिरातल्या  सेक्शुएली ट्रांसमिटेड डिजीज म्हणजेच एसटीडीसारख्या आजारांवर या गोळ्या घेणे म्हणजे आजारांना आमत्रणे देण्यासारखे आहेत.

जेव्हा आपण गोळी घेण्यास सुरूवात करतो तेव्हा आपल्याला पीरियड्स साइकलवेळी ब्लडिंग होण्याची शक्यता असते. ही एक सामान्य समस्या असली तरी गोळी घेतल्यानंतर हे 3 महिन्यांपर्यंत होते. नंतर ही समस्या हळूहळू नाहिशी होते. ज्यावेळी आपण गोळी घेतो, त्यावेळी आपले शरीर वेगवेगळ्या स्तरावरील हार्मोन्सशी कनेक्ट होत असते, म्हणून हा रक्तस्त्राव होत असतो, असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जेव्हा बर्‍याच स्त्रिया प्रथमच गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांना मळमळ, डोके दुखणे, अशक्तपणा जाणवणे असे त्रास सुरू होतात. त्यामुळे गोळी रिकाम्या पोटी घेण्याऐवजी खाण्याबरोबर किंवा झोपण्यापुर्वी घेण्याचे सल्ले डॉक्टर देतात. संबंधीत त्रास 3 महिन्यांनंतरही सुरू राहिल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. कोणत्याही कंपनीची गर्भनिरोधक गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News