तरुणाईचा ब्रेसलेट्‌ ट्रेंड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 3 August 2019
  • आजकाल तरुणींच्या हातात सोनेरी, चंदेरी रंगात असलेले मोठ्यांनी सजवलेले, खड्यांनी अडकवलेले ब्रेसलेट म्हणजे युवतींच्या हाताची शोभा वाढवण्याचं साधन बनत चाललं आहे.

‘मेरे हाथों में नौ- नौ चुडियाँ’ हे ९० च्या दक्षकातलं गाणं कदाचीत आताच्या तरुणीला भुरळ पाडणार नाही. कारण, भरगच्च भरलेल्या बांगड्यांची जागा आता नाजूक साखळी स्वरूपातील ब्रेसलेटने घेतली आहे. 

आजकाल तरुणींच्या हातात सोनेरी, चंदेरी रंगात असलेले मोठ्यांनी सजवलेले, खड्यांनी अडकवलेले ब्रेसलेट म्हणजे युवतींच्या हाताची शोभा वाढवण्याचं साधन बनत चाललं आहे. त्याबरोबर काहींना बांगड्यांची आवड असते. परंतु भरगच्च बांगड्या आवडत नसतात त्यांच्यासाठी एकाच ब्रेसलेटमध्ये दोन- तीन बांगड्या जॉइंट केलेल्या बाजारात उपलब्ध आहेत. आकर्षक, वेगळे दिसण्यासाठी अनेक तरुणी नेहमीच बाजारात येणाऱ्या अपडेट्‌स विषयी जाणून घेण्यासाठी कायमच अधीर असतात. त्यामुळे बाजारात जे काही नवीन येईल ते आपल्याकडे हवचं. असं प्रत्येकीलाच वाटत असतं.

नाजूक मनगटाला साजेल असा साखळी ब्रेसलेट म्हणजे त्या संपूर्ण पेहरावाला आणखीन एक वेगळाच लूक निर्माण करतो. मॅचिंग बांगड्या घालण्याची सवय काहीनां नसते. परंतु काहींना भरलेला हात अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या काहीतरी सुटसुटीत किंवा एकच काहीतरी घालता येईल, असे शोधत असतात. ब्रेसलेट हे सध्या तरुणींत आणि एकंदरीत संपूर्ण महिलावर्गात प्रसिद्ध होत आहे.

पारंपरिक पोषाखापासून ते इंडो वेस्टर्न लूकपर्यंतच्या सगळ्या पोषाखांसाठी ब्रेसलेट बाजारात उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाइन शॉपिंगमध्ये ब्रेसलेट विथ वॉचची खरेदी सध्या जास्त प्रमाणात केली जात आहे. ब्रेसलेट यांची ट्विस्ट ही बाजारात प्रचंड प्रसिद्ध होत आहे. ब्रेसलेटचा आकार, नजाकत आणि त्याला घड्याळाची जोड त्यामुळे तरुणींत या ब्रेसलेटची चलती पाहायला मिळत आहे. लाइट व डार्क रंगाचे ब्रेसलेट बाजारात उपलब्ध झाले आहेत. या घड्याळांना अनेक रंगांचे बदलता येणारे पट्टे मॅचिंग असे ब्रेसलेट विथ वॉच वापरता येते. त्यामुळे तरुणी व महिला वर्गांकडे यांचा ट्रेंड जास्तच दिसून येतोय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News