#Youthonbudget2020 इंग्रजीतलं आर्थिक बजेट नेमकं कोणासाठी?

नवनाथ गायकवाड, SND अभियांत्रिकी महाविद्यालयात, येवला
Saturday, 1 February 2020

हे बजेट देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी जवळ-जवळ 2 तास 40 मिनिटे लोकसभेत सादर केले, तेही पूर्ण इंग्रजीतून. ते जर भारतीय नागरिकांसाठी असेल तर हिंदीतून हवं होतं,

केंद्र सरकारचं आर्थिक धोरण 2020-21 या नवीन दशकासाठी जाहीर झाले. हे बजेट देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी जवळ-जवळ 2 तास 40 मिनिटे लोकसभेत सादर केले, तेही पूर्ण इंग्रजीतून. ते जर भारतीय नागरिकांसाठी असेल तर हिंदीतून हवं होतं, कारण भारतात किती टक्के जनता इंग्रजी समजू शकते? ते जाऊद्या, पण त्या सभागृहातील किती सदस्यांना हे बजेट कळाले, तेच सांगता येणार नाही. 

मीही एक शिक्षित बेरोजगार व शेतकऱ्याचा मुलगा म्हणून हे बजेट ऐकलं. त्यात आजच्या तरुणांच्या रोजगरा संबंधी काही ठोस ऐकायला नाही मिळालं, मग वाटलं शेतकऱ्यांसाठी ऐकावं, त्यात काय म्हणे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू.  आता ते कसं? हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. माझ्यामते ते सांगायची गरजही नाही.

शेतकऱ्यांनी ते कसं वाढवायचं हे अवगत केलय; पण त्यासाठी योग्य बाजारभावाचे नियोजन केले पाहिजे. दुप्पट उत्पन्नासाठी त्या संबंधीत असलेले भाव कमी करणे गरजेचे आहे. मागच्या काही काळात रासायनिक खतांचे व औषधांचे बाजारभाव दुपटीने वाढलेत मग कुठलल्या अर्थाने उत्पनादन कोणत्या पद्धतीने घ्यावे? हा प्रश्न साधारण शेतकऱ्यांसमोर उभा राहातो. दुसरा मुद्दा सरकारी कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सपसीडीचा आहे. त्या कंपन्यातरी कुठे सरकारकडून आलेला पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात, हा एक सर्वेक्षणाचा मुद्दा बनला आहे. एकंदरित पंतप्रधान मोदींच्या 2.0 सरकराचं दुसरं आर्थिक बजेट काहीच कळलं नाही, हे नक्की.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News