अॅशच्या किंगबाजीमुळे यिनबझचे अनावरण जल्लोषात

यिनबझ टीम
Monday, 28 January 2019

मुंबई : नवी मुंबई येथील खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये रविवारी (ता. 27) संध्याकाळी तरुणाईचे हक्काचे व्यासपीठ असलेले यिन बझ पोर्टलचे संगीतकार अनु मलिक आणि तरुणाईचा लाडका गायक अश किंग यांच्या हस्ते जल्लोषात अनावरण झाले. 

सेंट्रल पार्कमधील ऍम्फी थिएटरमध्ये झालेल्या यिन बझ पोर्टलच्या अनावरण कार्यक्रमास "सकाळ'चे संचालक संपादक श्रीराम पवार, संचालक तंत्रज्ञान भाऊसाहेब पाटील, मुख्य संपादक राहुल गडपाले, कार्यकारी अधिकारी महेंद्र पिसाळ, कार्यकारी अधिकारी उदय जाधव, संपादक संदीप काळे यांसह सिनेअभिनेत्री अमृता राव, संतोष जुवेकर, अभिनव बेर्डे आणि हेमल इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे हिंदी, पंजाबी, इंग्रजी; तसेच इतर भाषांमध्ये गाणी म्हणून स्वत:ची ओळख बनवणाऱ्या अश किंगचे. अशने जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना आपल्या गाण्यावर थरकावून सोडलं. या वेळी त्यांनी "वो बारीश का पानी', "नजर ना लग जाए' यासह चित्रपटसृष्टीमध्ये गायलेल्या आणि तरुणाईचे आकर्षण ठरलेल्या गाण्यांची मेजवानी तरुणांना दिली. गायक अनु मलिकच्या गाण्यावरही तरुणांनी बेभान होत ठेका धरला. या वेळी त्यांनी "गरम चाय की प्याली हो, टन टना टन, टन टन तारा' या हिंदी गाण्यासह आम्ही "डोलकरं डोलकरं' हे मराठी गाणं गायलं. 

"सकाळ' माध्यम समूहाचे "यिन बझ पोर्टल' हे तरुणाईला व्यक्त करण्याचे माध्यम असून यावर तरुणाईला लागणारे डिजिटल खाद्य येथे मिळणार आहे. यिन बझ या पोर्टलच्या माध्यमातून तरुणाईला बोलतं आणि लिहितं करावं, त्याचबरोबर त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने यिन बज काम करणार आहे. तुम्हीदेखील तुमच्या मनातलं यिन बझवर व्यक्त करू शकता. तुम्ही तुमचे लेख, ब्लॉग, चळवळ, प्रश्न आम्हाला मेलच्या माध्यमातून पाठवा आणि व्यक्त व्हा जगासमोर. 
अधिक माहितीसाठी यिन बझ पोर्टलच्या www.yinbuzz.com ला भेट द्या. आमचा मोबाईल नंबर 7350630000. ई-मेल आयडी आहे yinbuzzz@gmail.com 

अश किंग - सुप्रसिद्ध गायक 

(तरुणाईला व्यक्त होण्यासाठी "सकाळ माध्यमसमूहा'ने यीन बझच्या माध्यमातून केलेला प्रयोग नक्कीच प्रेरणादायी ठरेल. विशेषत: मराठी तरुणांना यानिम्मिताने अनेक सामाजिक उपक्रमात हिरिरीने आपला सहभाग नोंदवता येईल. एक नवी आशा घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमात मीसुद्धा सहभागी होणार आहे. 

अनु मलिक
(तरुणाईमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्या क्षमतेला एका चौकटीत बसवण्याचे काम यीन बझ करू पाहते. त्याला माझ्या खूप शुभेच्छा आहेत. नवी पिढी आणि जुनी पिढी यांचा मेळ बसवून उभे राहिलेले काम राज्याच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी पाऊल ठरेल.  
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News