तरुणांनो, तासन् तास वेब सीरिज पाहताय? सावधान! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 October 2019

बिंज वॉचिंगमुळे तब्येतीवर परिणाम होत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे वेब सीरिजच्या या व्यसनाचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत.

अनेक जण सिनेमा- मालिका हे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाहत असतात. त्या सोबतच यामध्ये वेब सीरिज पाहणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड वाढत चालली आहे. आठवड्या अखेरीस एकाच दिवशी वेब सीरिजचे सगळे भाग पाहायचे, मग त्यासाठी सात- आठ तास लागले तरी हरकत नाही, असे तरुण मंडळी करु लागली आहे. याच प्रकाराला बिंज वॉचिंग असे म्हणतात.

बिंज वॉचिंगमुळे तब्येतीवर परिणाम होत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे वेब सीरिजच्या या व्यसनाचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. दिवसभरातील काम पुर्ण झालं की रात्री उशिरापर्यंत अनेक जण वेब सीरिज पाहत असतात. व त्यामुळे झोप अपुरी राहते. अपुऱ्या झोपेमुळे तब्येतीवर वाईट परिणाम होऊ लागल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. सतत एकाच ठिकाणी बसून बिंज वॉचिंग केल्यामुळे लठ्ठपणाही वाढतोय असं म्हटलं जातं.

आठवडाभर कामामध्ये व्यस्त असलेली मंडळी ओटीटी प्लॅटफॉर्मवर जास्त येतात. ओटीटी प्लॅटफॉर्म हा मनोरंक असतो हे नक्कीच पण वेब सीरिज पाहण्यासाठी देखील एक चौकट आखणे आवश्यक आहे. आपण वेब सीरिज कधी आणि किती तास बघणार आहोत? हे प्रेक्षकांनी ठरवुन घेतले पाहिजेल. बिंज वॉचिंग केल्यामुळे लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याने चिडचिड होण्याचं प्रमाण देखील वाढल्याचे समोर आले आहे असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले आहे.        

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News