युवकांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

राजुरा: पर्यावरणदिनाचे औचित्त साधून जीवनदीप सर्पमित्र बहुउद्देशीय पर्यावरण संस्थेच्या युवकांनी जंगलालगत वाहणाऱ्या नाल्यावर श्रदानातून वनराई बंधारा बांधला. वनविभागाच्या मदतीने हा बंधारा युवकांनी बांधला. 

राजुरा: पर्यावरणदिनाचे औचित्त साधून जीवनदीप सर्पमित्र बहुउद्देशीय पर्यावरण संस्थेच्या युवकांनी जंगलालगत वाहणाऱ्या नाल्यावर श्रदानातून वनराई बंधारा बांधला. वनविभागाच्या मदतीने हा बंधारा युवकांनी बांधला. 

जीवनदीप सर्पमित्र बहुउद्देशीय पर्यावरण संस्था दरवर्षी पर्यावरणदिनी विविध उपक्रम राबवत असते. यंदा संस्थेने दुष्काळी परिस्थिती बघता वनराई बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी वनविभागाची मदत मागितली. वनविभागानेही जंगलात वाहणाऱ्या नाल्यावर वनराई बंधारा बांधण्याचे सांगितले. त्यानंतर पर्यावरणदिनी जंगललगत वाहणाऱ्या नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. 

याप्रसंगी उपविभागीय वनाधिकारी गरकल, वन परिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट, पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लांडे, सचिव रतन पचारे यांची उपस्थिती होती. वनविभागाचे कमर्चरी, जीवनदीप पर्यावरण संस्थेचे सदस्य आणि पर्यावरणप्रेमीनी श्रमदानातून जवळपासच्या जंगलातील बंधाऱ्यावर वनराई बंधारा बांधला. यावेळी मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. आर. सी. पेदापल्लीवार, चौबे, कारेकर, वांढरे, बानकर, देवाळकर, जीवनदीप पर्यावरण संस्थेचे पदाधिकारी विजय पचारे, संदीप आदे, प्रवीण दुरगुडे, कैलास निवळकर, रत्नाकर पचारे, तुषार खोके, सचिन खेडेकर, पचारे, विजय पचारे , परील बोबडे, आदर्श विद्यालयाचे हरित सेना युनिटप्रमुख बादल बेले यांनी श्रमदान करून वनराई बंधारा बांधला.

दिवसेंदिवस पाण्याची पातळी वेगाने खाली जात आहे. त्यामुळे अलीकडे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भविष्यातील जलसंकट टाळायचे असेल तर पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण राबवावे लागेल. यासाठी प्रत्येकाने आपल्या शेतशिवारात, नाल्यांवर बंधारे बांधले पाहिजे. सोबत वृक्षलागवड केली पाहिजे, असे प्रतिपादन उपविभागीय वनाधिकारी गरकल यांनी केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News