तरुणाई मोबाईलच्या विळख्यात अडकलीय का?

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Wednesday, 19 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • दिसेंवदिवस तरुणाई आणि मोबाईल यांच समीकरण अधिक घट्ट होत चातल आहे. बहुतांश तरुणाई विनाकार मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेली दिसते.

मुंबई : अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण मानवाची मुलभुत गरज बनली आहे, तशी मोबईल ही तरुणाईची अत्यावश्यक गरज बनली आहे.  दिवसेंदिवस तरुणाई आणि मोबाईल यांच समीकरण अधिक घट्ट होत चातल आहे. बहुतांश तरुणाई विनाकार मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेली दिसते. त्यामुळे तरुणाई मोबाईलच्या विळख्यात अडकलीय का? या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. त्यातील विद्यार्थी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

होय.... याविषयाला अनुसरूनच काही काळा पुर्वी आम्हाला एक निबंधाचा विषय होता "विज्ञान शाप की वरदान" त्याचीच एक शाखा म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान विकसित मोबाईल आणि हे योग्य रितीने वापरला तर वरदान आहे पण आपल्या मराठीच्या म्हणी प्रमाणे अति तेथे माती... सध्याच्या तरुणाईची दिनचर्या ही रोजच बदलत असते, त्यामुळे वेळापत्रक कोलमडलेलं असतं आणि त्यातुन मोकळीकच मोकळीक असते. त्यातून मुक्त होण्यासाठी all in one सोल्युशन म्हणजे मोबाईल. सध्याच्या युगात मोबाईल ही एकमेव वस्तू आहे जी 24 तास आपण आपल्या सोबत हाताळू शकतो म्हणून तरुणाईच नाही तर प्रत्येक माणूस हा मोबाईलच्या विळख्यात सापडत चाललेला आहे
- उत्कर्ष भोसीकर

मानवाने विज्ञानात खूप प्रगती केली. नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले. त्याच तंत्रज्ञानाचा भाग म्हणजे मोबाईल. मोबाइलचा जर योग्य वापर केला तर चांगला. उलट अतिवापर केला तर हानिकारक आहे, पूर्वी नातेवाईकांना बोलण्यासाठी पत्राचा उपयोग व्हायचा. तो तरुण आज परिवाराला वेळ देण्याऐवजी मोबाईला वेळ देऊ लागला. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे जाण्याचा धोका पण उद्भवू शकतो. पब्जी सारख्या गेममुळे तर काही मुलांना आपला जीव गमवावा लागला. शेवटी कोणतीही वस्तू गरजेपेक्षा जास्त वापरल्यास त्यापासून नुकसान होत असते. तरुणांनी मोबाईला जास्त महत्व न देता स्वतःचे भविष्य घडवण्यावर जास्त भर द्यायला पाहिजे.
- कृष्णा गाडेकर

मोबाईल हा ऐकेविसव्या शतकात मानवाची गरज झाली आहे, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आता मोबाईल, तुम्ही या गोष्टीचा याच्या वरूनच अंदाज येऊ शकता की, आपण मोबाईल ह्या विषयावर मोबाईल वरच बोलत आहोत, याच्यापेक्षा आता मोठ स्पष्टीकरण कुठे मिळणार नाही. 
- अजिंक्य भालेराव

होय. आजचा तरुण हा मोबाईलच्या विळख्यात अडकलाय... गरज ही शोधाची जननी आहे. ह्या उक्तीनुसार मानवाने गरजेपोटी आपल्या बुद्धी व विज्ञानाच्या आधारे निरनिराळे क्रांतिकारक शोध लावले. त्यापैकी एक भ्रमणध्वनीचा शोध लावला. मोबाईलचा योग्य तिथे व योग्य प्रमाणात वापर केला तर तो एक वरदानच आहे. कारण खरे पाहता मोबाईल हे कमी वेळात, कमी खर्चात दूरवर असलेल्या व्याक्तीशी व आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे एक उत्तम माध्यम आहे. मोबाईल नसता तर आपल्याला पूर्ण पणे पोस्ट खात्यावर अवलंबून राहावे लागले असते. त्याचप्रमाणे मोबाईलच्या साह्याने आपण निरनिराळ्या प्रकारची कामे एका मिनिटात पूर्ण करू शकतो. परंतु आजचा तरुण हा मोबाईल विनाकारण वापरामुळे मोबाईलच्या जाळ्यातमध्ये अडकलेला आढळतो. आजच्या तरुणाईला मित्रमंडळी, नातेवाईक, घरातील माणसे यांच्याशी जिवाभावाच्या दोन गोष्टी बोलणे दुरापास्त झाले आहे. यामुळे माणूस भावनिकदृष्ट्या इतर व्यक्तीपासून दुरावत चालला आहे. आजच्या तरुणाला आपल्या बाजूला बसलेल्या आपल्याला आई वडिलांचे बोलणे ऐकण्यापेक्षा व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर वरील बडबड ऐकण्यात मजा यायला लागली. त्यामुळे यांच्यात एक प्रकारचा दुरावा झाल्याचं दिसून येत. तर आजच्या तरुण पिढी नी हे कुठे तरी थांबवायला पाहिजे. व मोबाईलचा योग्य तिथे व योग्य तितक्याच प्रमाणात वापर करायला पाहिजे. आणि आपल्या परिवाराला वेळ दिला पाहिजे. जेणे करून मोबाईल हार्दिक एक वरदानच ठरेलं.
- पंकज खडसे

आता बघायला गेले तर, मुलांना मोबाईल फोन ही खूप सोपी गोष्ट झाली आहे त्यांना कोणतेच भान राहिले नाही. त्यामुळे तरुण मुले भानाहुन गेले आहेत. कुठलेही व्यसन आपल्याला दुष्परिणाम दाखवते. त्यामुळे आपली क्रिएटिव्हिटी थांबते. मोबाईल मधील पबजी गेम हे एक व्यसन झाले आहे. या गेमचा मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. मुलामध्ये आणि तरुण पिढीमध्ये वागणुकीत बदल होणे, सतत खोटे बोलणे, लपवालपवी करणे अश्या गोष्टी वाढू लागतात. खर तर पालक सुद्धा याला कारणीभुत आहेत मुलांना फोन दिला की त्यात मुलगा काय करतो हे सुद्धा बघत नाहीत. त्यामुळे मुळे मुले जास्त बिघडतात. मोबाईल मुळे मुलांचे अभ्यासात मन लागत नाही. मुले झोपीत बोलत आहेत. त्यांची विचार करायची क्षमता कमकुवत होत चाललेली दिसत आहे. अगदी लहान मुलांपासून ते तरुण मुलांपर्यंत हे मोबाईल चे व्यसन लागलेले आहे. त्यामुळे पालकांनी जरा विचार करायला हवा.
- सुरज कांबळे

मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन साधनांचा, तंत्रज्ञानाचा शोध लावला. असे इतिहासपूर्वी ते आजपर्यंत  झालेल्या घटनात दिसून येते. उदा. मुलभूत गरजा. त्याचप्रमाणे 21 व्या शतकात व्यक्ती संवाद अधिक सोईस्कर व दूर अंतरावरील व्यक्तीशी कश्या प्रकारे कमी वेळेत संवाद साधला जाईल .यासाठी टेलीफोन वापरले व त्याचेच रूपांतर आज स्मार्ट मोबाईल मध्ये झाले. असो सुरवातीला सर्वाना या तंत्रज्ञानाचे नाविन्य, कुतुहूल होते. व याचा चांगला प्रकारे देखील वापर केला जात असे. कारण त्या वेळी महागाई व पैशाला किंमत असल्यामुळें सर्वजण योग्य प्रकारे उपयोग केला जात असे. हळूहळू हा मोबाईल सर्वांच्या हातात येऊ लागला.  आज 2 वर्षे असलेल्या मुलांच्या हातात दिसतोय. ज्यांना खरंच याच्या वापरायची आवश्यकता आहे त्याच्याकडे 2 मोबाइल दिसतंय व ज्यांना नाही त्याच्याकडे महागडे मोबाइल दिसताय. खरंच आज तरुणाई मोबाईलच्या विळख्यात अडकलेली दिसतेय.  social media, webside, serch यांचा जास्त वापर तरुणात वाढत चालला आहे. दिवस भरात 1.5GB पण कमी पडतंय.  सतत वेगवेगळ्या app चा वापर करताना दिसताय. tiktok, game इत्यादी. (भारतात एकूण 59 Chinese mobile app बंद केले आहे) यामुळे  माणसाला माणसाशी बोलायला वेळ मिळत नाही. अमुल्य वेळ वाया घालवला जातो. (education सोडून). महिन्याला 150, 200, 300 व 600 रु प्रमाणे आर्थिक नुकसान होतेय. या अतिमोबाईल वापरामुळे तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढून मानसिक आजार, व शारीरिक हानी होताना दिसतेय. भारतातील इतर कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. व आपल्या पद्धतीने लोकांकडून पैसे काढला जात आहे. पर्यावरणावर देखील याचे विपरीत परिणाम दिसून येत आहे. लोकसंख्येत चीन नंतर आपलाच देश आहे तसेच जास्त net वापरण्यात देखील आपल्याच देशाचं नाव येत. आजच्या तरुणांनी आपल्याला  गरज भासेल तेवढाच उपयोग केला पाहिजे.
- सुनिल कोटकर 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News