सामाजिक परीवर्तनासाठी तरुणाईने वाटा उचलावा : अश्विनी कराडे

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Monday, 1 June 2020

फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील मान्यवरांच्या 'यिनबझ'साठी खास मुलाखत घेण्यात येत आहे. सोमवारी (ता.01) उमंग सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी कराडे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यांनी 'युवक आणि सामाजिक कामाची सांगड' या विषयावर तरुणाईशी संवाद साधला. 

'ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे काही देणे लागतो' ही जाणिव तरुणांनी लक्षात ठेवुन सामाजिक काम केले पाहीजे. सामाजिक काम करण्यासाठी कुटुंब, व्यवसाय, नोकरी, शिक्षण सोडण्याची गरज नाही. सर्व व्यवहार व्यवस्थित सांभाळून सामाजिक काम करता येते. प्रत्येकांकडे काही कौशल्य असतात ती कौशल्य तरुणाईने आपल्या वेळेनुसार समाजाला शिकवावी, सामाजिक परीवर्तनासाठी तरुणाईने आपल्या क्षमतेप्रमाणे वाटा उचलावा असे आवाहन अश्विनी कराडे यांनी केले.  

फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील मान्यवरांच्या 'यिनबझ'साठी खास मुलाखत घेण्यात येत आहे. सोमवारी (ता.01) उमंग सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी कराडे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यांनी 'युवक आणि सामाजिक कामाची सांगड' या विषयावर तरुणाईशी संवाद साधला. 

प्रत्येकजन हा आपआपल्या क्षमतेप्रमाणे काम करतो. उद्योगपती रतन टाटा यांनी देशभर अनेक रुग्णालयाची स्थापना केली आणि कोरोना संकट काळात मोठी रक्कम शासनाला देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडली, त्याच प्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांनी पानी फाऊंडेशन स्थापन करुन पानी साठवणुकीची सामाजिक चळवळ सुरु केली, सलमान खान, अक्षण कुमार दरवर्षी सैनिकांसाठी विविध कार्यक्रम आयोजिक करत असतात अशा कलाकारांचा आदर्श घेऊन सामाजिक काम केले पाहीजे.  

सामाजिक काम का कराव? 

भगत सिंह, राजगुरु, सुखदेव अशा अनेक तरुणांनी देशात सामाजिक चळवळ सुरु केली. त्यामुळे तरुणाईला विशेष महत्त्व आहे. तरुणच देशाची दशा आणि दिशा ठरवु शकतात. समाज विकासासाठी तरुणांनी सामाजिक काम करावे. तरुण हा समाजाचा कणा आहे. हा कणा मजबूत असेल तर समाज परिवर्तन वेगाने होईल त्यामुळे तरुणांनी समाजिक कामात भाग घेणे आवश्यक आहे.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News