राष्ट्र विकासात तरुणांनी योगदान दिले पाहिजे: मनोहरराव हेपट

आकाश प्रभाकर आंबोरकर
Monday, 16 March 2020

फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथे 'समूदाय विकासात युवकाची भूमिका' या विषयावरील सोमवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

गडचिरोली: 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवकांनी आपली जबाबदारी ओळखुन कामे केल्यास अशक्य गोष्टी साध्य करता येतात, त्याकरीता युवकांनी सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन आपली मते मांडली पाहिजे व राष्ट्र विकासात आपले योगदान दिले पाहिजेत' असे मत मनोहरराव हेपट यांनी व्यक्त केले.

फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथे 'समूदाय विकासात युवकाची भूमिका' या विषयावरील सोमवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेलफेअरचे समन्वयक मनोहरराव हेपट बोलत होतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रुपेंद्रकुमार गौर तर आणि प्रा. डॉ. किशोर कुडे उपस्थित होतो.

अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. गौर म्हणाले 'भारतात प्राचीन कालापासूनच युवक हा देशातील राजकीय आणि सामाजिक घडामोडीत अग्रस्थानी होता व आजही आहे. त्यामुळे युवकांकडून समाज परिवर्तनाची जबाबदारी आहे. त्याकरिता सामाजिक बांधीलकी समजून काम करावे'. कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा. डॉ. अभय लाकडे यांनी केले तर संचालन कु. सुषमा वासनिक आणि आभार किशोर किनेकार यांनी मानले.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News