तरुणाईने तयार केलेलादक 'हा' लघुपट हॉलीवूड स्टुडिओमध्ये प्रदर्शित होणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 April 2020

हा लघुपट यूट्युबवरही प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटसृष्टीतील कोणताही अनुभव नसताना तरुणाईने "पाखर' नावाचा लघुपट तयार केला आणि तो हॉलीवूडमधील पाईनवूड आणि रेलेह या स्टुडिओमध्ये दाखवण्यात येणार आहे.

हा लघुपट यूट्युबवरही प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सुराज कुटे लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती तृषाली फदालेने केली आहे.  हरिश्‍चंद्र भांडारे, ऊर्मिला डांगे, सचिन फदाले, सुभाष मुंडे, स्वप्नाली केळजी, अंजली यादव आदी कलाकारांनी या लघुपटात मुख्य भूमिका साकारली आहे. हे सारे कलाकारही नवोदितच आहेत. या लघुपटाची कथा आजच्या काळातील आहे. "पाखर'ची हॉलीवूड भरारी म्हणजे या तरुणांच्या मेहनतीला मिळालेलं यश आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News