...तर विजयापासून कोणीही रोखू शकत नाही: पवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

'जनतेशी खोट बोलू नये, जनतेची प्रमाणिकरणे कामे केली तर विजयापासून कोणीही रोखू शकत नाही असा सल्ला शरद पवार यांनी दिला

नगर: 'यंदाच्या विधानसभा निवणुकीत शरद पवार निवृत्त होतील अशी चर्चा सुरु असताना पवारांनी संपुर्ण राज्य पिंजून काढलं, पक्षाला नवी उभारणी दिली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत यश मिळालं. कितीही मोठी समस्या आली तरी घाबरायचं नाही, त्याचा सामना करायचा, हार मानायची नाही असा मोलाचा सल्ला शरद पवारांनी दिला' असे मत कर्जत- जमखेडचे आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केले.   

https://www.yinbuzz.com/kandi-policemans-grandfather-made-shock-legislator-23307

संगमनेर शहरामध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने 'मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सव' आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी संवाद तरुणाईशी कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हणून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, आमदार ऋतुराज पाटील, आमदार धीरज देशमुख, आमदार झिशान सिद्दिकी उपस्थित होतो. यावेळी मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी रोहीत पवार यांना विविध प्रश्न विचारून बोलत केल. 

'जनतेशी खोट बोलू नये, जनतेची प्रमाणिकरणे कामे केली तर विजयापासून कोणीही रोखू शकत नाही असा सल्ला शरद पवार यांनी दिला, त्यामुळे जणेतची प्रमाणिक पणे कामे केली आणि जनतेनी मला निवडून दिले असे रोहित पवार यांनी सागितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News