युवकाच्या कलागुणांना प्रोत्सहन देण्यासाठी युवा धोरण: शिवाजी गावंडे 

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Saturday, 23 May 2020

तरुणाईच्या हक्काचं व्यासपीठ 'यिनबझ'वर मान्यवरांच्या खास मुलाखती घेण्यात येत आहेत. शनिवारी (ता. 23) फेसबुक लाईव्हद्वारे शिवाजी गावंडे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी 'सामाजिक कामात युवकांचा सहभाग किती महत्त्वाचा' या विषयावर तरुणाईशी संवाद साधला. समाजकारण, राजकाराण, सामाजिक जाणीव आदी विषयांवर तरुणाईशी संवाद साधला.

तरुणाईत प्रचंड उर्जा शक्ती असते. 'लाथ मारेल तीथे, पाणी काढण्याची क्षमता तरुणाईत असते. मात्र राजकारणी युवकांचे डोके गरम करुन राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहेत. तरुणाईने हा राजकीय डाव उधळून टाकला पाहीजे आणि समाजिक कामात पुढाकर घेतला पाहीजे. तरुणांईचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने 2012 पासून युवा धोरण राबवण्यास सुरुवात केली. युवा धोरण राबवण्यासाठी सरकार विशिष्ठ निधींची तरतूत करते. युवकांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पुरस्कार जाहीर करते. मात्र अनेक तरुणांना युवा धोरण माहिती नाही अशी खंत शिवाजी गावंडे यांनी व्यक्त केली.

तरुणाईच्या हक्काचं व्यासपीठ 'यिनबझ'वर मान्यवरांच्या खास मुलाखती घेण्यात येत आहेत. शनिवारी (ता. 23) फेसबुक लाईव्हद्वारे शिवाजी गावंडे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी 'सामाजिक कामात युवकांचा सहभाग किती महत्त्वाचा' या विषयावर तरुणाईशी संवाद साधला. समाजकारण, राजकाराण, सामाजिक जाणीव आदी विषयांवर तरुणाईशी संवाद साधला.

सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना अनेक अधिकार दिले आहेत. आर्थिक दृष्ट्या गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी 'आपले गाव आपले अधिकार' राबवण्याची सुवर्ण संधी ग्रामसभेला दिली आहे. गावातील प्रत्येक नागरिकांना रोजगार देण्याचे काम ग्रांमपंचायतीचे आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, मुलभुत गरजा पुरवण्याचे काम ग्रामपंचायतीला करावे लागते. मात्र अनेक गावात असे होताना दिसत नाही. यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा आणि आपले गावी स्वंयपुर्ण करावी असा सल्ला शिवाजी गावंडे यांनी तरुणांना दिला. 

अभ्यास मंडळ

ग्रामीण भागात पुर्वी मनोरंजनाची साधने नव्हती तेव्हा गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन कार्यक्रम आयोजिक करायचे आणि सुखी, समाधानी जीवन जगायचे. मात्र सध्या गावे बकाल होत चाचली आहेत. गावांना पुनर्रजिवीत करायचे असेल तर तरुणाईने अभ्यास मंडळ स्थापन करावा. अभ्यास मंडळाच्या माध्यमातून गावातील विविध समस्या सोडवता येतील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News