परप्रांतीय तरुण राजस्थामध्ये फडकवणार मनसेचा झेंडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 February 2020

मनसेत सहभागी होण्याची इच्छा आहे, तुम्ही परवानगी दिली तर राजस्थान राज्यात मनसेचा झेंडा फडकवुन पक्षाला बळकटीकरण देवु' असा विश्वास उमेश शर्मा या तरुणाने व्यक्त केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वावर आणि धडाकेबाज भाषणांवर तरुणाई नेहमीच आकर्षित होत असते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष तरुणाईसाठी नेहमीच आकर्षणाच केंद्र ठरला आहे. मनसेत काम करण्यासाठी तरुणाई नेहमीच इच्छूक असते. मनसे पक्षाची क्रेझ राज्यापुरती मर्यादीत न राहता देशभर पसरली आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या तरुणांनी मनसे पक्षात काम करण्याची इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या हक्कासाठी नेहमीच आवाज उठवते. त्यामुळे मराठी तरुणांचा ओढा मनसेकडे असतो. लोकसभा निवडणुकीत मनेसेने एकही उमेदवार उभा केला नाही मात्र, निवडणूक प्रचारात राज ठाकरेंनी केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला. संपुर्ण निवडणुकीत राज ठाकरेंच्या भाषणांची चर्चा होती. लोकसभा प्रचारातून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी मनसे करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने आपले उमेदवार उभे केले आणि जोरदार प्रचार केला मात्र, मनसेचा एकच उमेदवार निवडून आला. त्यामुळे मनसेला उतरती कळा सुरु झाली. पक्षाला पुर्नउभारणी देण्यासाठी राज ठाकरेंनी पक्षात काही बदल करण्याचा निर्णय घेतला. पुर्वीचा झेंडा बदलून राजमुद्रा असलेला भगवा झेंडा हाती घेतला. त्यामुळे मनसे हिंदूत्वाकडे झुकला.
 
मनसे हिंदूत्वाकडे झुकल्यामुळे परप्रांतीय तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर राज्यस्थानच्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 'राज ठाकरे साहेब तुम्ही हिंदूत्वातचा मुद्दा घेऊन काम करत आहात ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मनसेत सहभागी होण्याची इच्छा आहे, तुम्ही परवानगी दिली तर राजस्थान राज्यात मनसेचा झेंडा फडकवुन पक्षाला बळकटीकरण देवु' असा विश्वास उमेश सर्मा या तरुणाने व्यक्त केला.
 
हिंदूह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी राज ठाकरेंची कार्यशैली आहे. बाळासाहेबांचे विचार तुमच्या कृतीतून दिसतात. संपुर्ण हिंदूच नेतृत्व करण्याची क्षमता राज साहेंबांकडे आहे असे तरुणांने सांगितले. देशात घुसखोरी करणाऱ्या लोकांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी (ता. 9) महारॅलीचे आयोजन केले आहे. यावेळी परप्रांतीय तरुण मोठ्या संख्येनी रॉलीत सहभागीहोण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News