मोबाईल आणि इंटरनेटपासून दूर राहण्यासाठी गावकऱ्यांनी केला अभिनव प्रयोग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 January 2020

एका गावातील काही कुटुबांनी इंटरनेट आणि मोबाईलपासून दूर राहण्यासाठी एक अभिनव प्रयोग सुरु केली आहे. जाणून घेऊ काय आहे हा प्रयोग...

अन्न, वस्त्र, निवारा यासोबतचं मोबाईल ही मुलभुत गरजा झाली आहे. तरुणाई सजीवमानसा पैक्षा अधिक निर्जीव मोबाईमध्ये गुंग आहे. दिवसातला सर्वांधिक वेळ तरुणाई मोबाईवर व्यस्त आहे. नात्यांपेक्षा अधिक महत्त्व मोबाईला दिले जात आहे. त्यामुळे नात्यात दुराव निर्माण होत आहे. एका गावातील काही कुटुबांनी इंटरनेट आणि मोबाईलपासून दूर राहण्यासाठी एक अभिनव प्रयोग सुरु केली आहे. जाणून घेऊ काय आहे हा प्रयोग...  

नात्याचा दुरावा कमी करण्यासाठी अभिनव प्रयोग

छत्तीगड राज्यातील बोडरा गावामध्ये 11 कुटुंब रोज एक तास कु़टुंबातील सर्व सदस्य मिळून वेळ घालवतात. दररोज एकाच्या घरी जावून वेळ गप्पा करतात. त्यामुळे संबंध दृठ होतात आणि मोबाईलमुळे होणारा नात्याचा दूरावा कमी होतो.

'इंटरनेटमुळे नात्यात दुरावा निर्माण होत आहे तसेच, परस्पर संवादही कमी होत आहे. त्यामुळे एकमेकांमध्ये ताळमेळ बसत नाही' असे कुटुंब सदस्यांनी सांगितले.

पुर्वी 11 कुटुंबात कोणतही नातं नव्हत

संवाद अभिनव उपक्रम पाच वर्षापुर्वी दोन कुटुंबांनी सुरु केला. त्यात फक्त कुटुंब प्रमुख सहभाग घ्यायचे. त्यानंतर 11 कुटुंबातील 70 सदस्य एकमेकांसोबत जोडले गेले. कुटुंबात समस्या निर्माण झाली की सर्वजन मदतीला धावुन येतात. महत्त्वाचं म्हणजे 11 कुटुंबात कोणतही ब्लड रिलेशन नाही.

समस्या सोडवण्यासाठी आर्थिक मदत

आम्ही पुर्वी एका गावात राहूनही कुठे काय चालू आहे याची माहिती मिळत नव्हती. कारण सर्वजन मोबाईवर व्यस्त असायचे. आता सर्वजन सायंकाळी 6.30 ते 7.30 एक तास मिळून चर्चा करतात त्यामुळे संवाद वाढला आहे, असे टोमनलाल साहू यांनी सांगितले. आजारी संकटात असेल अशावेळी सर्वजन आर्थिक मदत करतात.

संवाद वाढवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन

लोकांशी अधिक संवाद वाढावा यासाठी वर्षातून एकदा दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमात लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वजन सहभागी होतात.

जनतेच संवाद वाढावा यासाठी पाच वर्षापासून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, अशा कार्यक्रमातून तरुणांना मोबाईलच्या वेसनापासून दूर ठेऊन मानसांसोबत संवाद वाढवता येते, हे सिद्ध झाले आहे.
-
वसंत बाहू, कुटुंब प्रमुख 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News