विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी: अनुजा भास्कर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020

कोकणातल्या मुलांमध्ये असलेल्या बुद्धिमत्तेचा विचार करता कोकणामध्ये सर्वात जास्त अधिकारी होणे गरजेचे आहे

सावंतवाडी: कोकणातल्या मुलांमध्ये असलेल्या बुद्धिमत्तेचा विचार करता कोकणामध्ये सर्वात जास्त अधिकारी होणे गरजेचे आहे परंतु, युवावर्ग स्पर्धा परीक्षांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे आपले लक्ष केंद्रित करून भविष्यात अधिकारी बनण्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असे आवाहन तलाठी अनुजा भास्कर यांनी केले.

सावंतवाडी येथील महेंद्र क्लासेसमध्ये 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा' मंगळवारी आयोजित केली होती यावेळी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनुजा भास्कर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महेंद्रा क्लासेसचे संचालक महेंद्र पेडणेकर आणि समन्वयक राजेश्वर रेडकर उपस्थित होते.  

अनुजा म्हणाल्या, "विद्यार्थ्यांनी कमी वयातच अधिकारी बनण्याची स्वप्ने पहावीत आणि त्यादृष्टीने आपली शैक्षणिक वाटचाल सुरू करावी. कोकणातील विद्यार्थ्यांना दहावी, बारावी चांगली टक्केवारी मिळूनही तरुणाई अधिकारी बनण्यासाठी आपली मानसिकता दाखवत नाहीत तसेच अशा परीक्षेतही पुढे येत नाहीत. त्यामुळे कोकणातील तरुणाईने अधिकारी बनण्यासाठी जिद्दीने अभ्यास करावा, यश निश्चित मिळेल" असे त्या म्हणाल्या. यावेळी महेंद्र क्लासेसचे संचालक श्री. पेडणेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News