युवा डान्सिंग क्वीन कृतिका गायकवाडने उलगडलं तिच्या सौन्दर्याचे रहस्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 February 2020
  • प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपण फिट राहावं, आणि त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. विशेषतः आजची तरुणाई फिटनेसच्या बाबतीत अधिक जागरूक असलेली दिसून येते. त्यामुळे त्यांच्यातील जिमचं क्रेझ दिसून येतं. सशक्त आणि लवचिक शरीरासोबतच तेजस्वी त्वचा, तसेच या धकाधकीच्या जीवनात हवी असणारी मनःशांती या सर्वासाठी योगसाधना करणे खूप गरजेचे आहे.

प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपण फिट राहावं, आणि त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. विशेषतः आजची तरुणाई फिटनेसच्या बाबतीत अधिक जागरूक असलेली दिसून येते. त्यामुळे त्यांच्यातील जिमचं क्रेझ दिसून येतं. सशक्त आणि लवचिक शरीरासोबतच तेजस्वी त्वचा, तसेच या धकाधकीच्या जीवनात हवी असणारी मनःशांती या सर्वासाठी योगसाधना करणे खूप गरजेचे आहे. परंतु प्रत्येकाला योगाचे फायदे लक्षात येत नाहीत, कारण ते शरीराच्या अंतर्गत स्तरावर परिणाम करत असतात. आणि त्याचे फायदे हे अगणित असतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Blessed , stressed and yoga obsessed #yoga #krutikagaikwad

A post shared by Krutika Gaikwad (@krutikaim) on

दररोज योगा केल्याने तुमचा संपूर्ण दिवस हा फ्रेश जातो तसेच शारीरिक तंदुरुस्ती राहते. अनेक सेलेब्रिटींचं जास्त वयातही तरुण आणि उत्साही राहण्याचं एकमेव कारण म्हणजे योगसाधना आहे. अशीच एक सेलेब्रिटी आहे जी वेळात वेळ काढून योगसाधना करून आपलं सौन्दर्य जपत आहे. ही सेलिब्रिटी म्हणजेच युवा डान्सिंग क्वीन कृतिका गायकवाड. झी युवावरील डान्सिंग क्वीन कार्यक्रमाची स्पर्धक असणाऱ्या कृतिका गायकवाड हिने अत्यंत कमी कालावधीत आपल्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. तिचं सौन्दर्य आणि नृत्यातील अदा नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पाडत असते. त्यामुळे कृतिका आपल्या दिसण्यावर आणि फिटनेसकडे विशेष लक्ष देत असल्यामुळे ती दररोज योगा करत असते.फिट राहण्यासाठी ती दिवसभरात १०८ वेळा सूर्यनमस्कार तर नियमित अष्ठांग यॊगासनही करते. 

योगाबद्दल बोलत असताना कृतिका म्हणाली की, "स्पर्धेमुळे मी सध्या व्यस्त राहते,त्याचबरोबर  स्पर्धेत टिकून राण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत असून त्याचा एक वेगळाच ताण असतो. म्हणूनच या तणावापासून दूर राहण्यासाठी मी योगसाधना करते.  शारिरीक फिटनेससोबतच मानसिक तणाव दूर करणे महत्वाचे आहे. कारण दिवसभर केलेल्या चांगल्या वाईट विचारांचा समतोल साधून मनःशांती मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे योग. त्यामुळे प्रत्येकाने वेळात वेळ काढून योगसाधना करणे गरजेचे आहे असे मला वाटते". कृतिकाचे योगसाधनेचे फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News