'या' शाळेत तरुणांना शिकवले जाते डेटिंगचे धडे!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 January 2020

तरुणीला इंम्प्रेस करणे सोप काम नाही. त्यामुळे तरुणांसाठी डेटिंग शाळा सुरु करण्यात आली

तरुणीला इंम्प्रेस करणे सोप काम नाही. जस डान्स एक कला आहे, तसचं डेटिंग ही एक कला आहे. चिनी तरुणींना डेटींगसाठी म्हणवने ही खुप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे तरुणांसाठी डेटिंग शाळा सुरु करण्यात आली आहे. शाळेत तरुणांना डेटिंगचे धडे शिकवले जातात.

पहिल्याचं मुलाखतीत तरुणींना पटवले जाते

चिनची राजधानी बीजिंगमध्ये डेटींग शाळा सुरु करण्यात आली. शाळेला 'लव एनर्जी' नावाने ओळखले जाते. यी कुई उर्फ मोका संस्थेने ही शाळा सुरु केली. यी कुईने दिलेल्या माहितीनुसार डान्स प्रकारासारखं डेटींग आहे. कधी तरुणी आपल्याकडे आकर्षीत होते तर कधी तरुण तरुणीकडे आकर्षीत होतो. काही वेळी तरुणीला दूर ठेवण महत्त्वाचं असत. अशावेळी संवेदणशील राहणे गरजेचं आहे. डेटींग शाळेत प्रवेश घेतलेले तरुण पहिल्याचं प्रयत्नात तरुणींना पटवन्यात यशस्वी होतात.

काय शिकवलं जात डेटिंग शाळेत?

तरुणांचा मेकअप करुन फोटो काढले जातात. मेकअप फोटो सोशल मीडीयावर अपलोड करुन तरुणांची इमेच उंचावली जाते. त्यानंतर तरुणांना 'काबे डान' नावाची जापानी शिकवन दिली जाते. त्यात तरुणींना इम्प्रेस करण्याच्या पद्धती शिकवल्या जातात.

'तरुणीला प्रपोज केल्यानंतर ती होकार देणार नाही या भितीने तरुण नेहमी घाबरतात त्यामुळे डेटिंग शाळा सुरु करण्यात आली आहे' असे प्राध्यापकाने सांगितले   

तरुणींना पटवण्याचे विविध प्रकार उपलब्ध

ली कुई म्हणतात की, 'प्रेम आणि डेटींगचं ट्रेनिंग देणे वाटते तेवढं सोप काम नाही, डेटींग शिकविण्यासाठी अनुभवी शिक्षण मिळणे कठीन काम आहे. ही शाळा डेटींगचे ऑनलाईन कोर्सेस घेते. ज्याची फी 30 डॉलर आहे. म्हणजे 2 हजार 160 रुपये.
क्लासेस असो किंवा ऑनलाईन कोर्सेस यामध्ये प्रोफेशनली तरुणी पटवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

शाळेत प्रवेश घेण्यासाठी इतकी फी

लव कोचिंग क्लास ऑनलाईन उपलब्ध आहे, त्याची फी प्रतीमाह 30 डॉलर आहे (म्हणजे 2 हजार 160 रुपये) प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण घेण्यासाठी प्रतिमहीना 3 लाख रुपये खर्च येवु शकतो. अश्चर्याची गोष्ट म्हणजे डेटींग शाळेत 23 ते 60 वर्ष वय असलेल्या लोकांनी प्रवेश घेतला आहे.

ट्रेनिंग नंतर आनंदात तरुण

डेटींग ट्रेनिंगमध्ये तरुणांच्या कमजोर बाबींवर पुर्ण करण्यात भर दिला आहे. तरुणींना कशा प्रकारे खुश ठेवल पाहीजे याच प्रशिक्षण दिले आहे, त्यामुळे तरुणी आनंदात राहतात. डेटींग प्रशिक्षणानंतर अनेक तरुण आपल्या जोडीदारासोबत सुखी, समाधानी जीवन जगत आहेत.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News