भरतीच्या नावाखाली उच्च शिक्षित तरुणाने घातला लाखोंचा गंडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

आरोपी जितेंद्र तायडे हा उच्चशिक्षित अभियंता आहे. त्यांने सिव्हिल इंजिनिअरींगची पदवी घेऊन पुणे महापालिकेमध्ये नोकरी मिळवली होती. मात्र, लवकर श्रीमंत होण्याच्या नादात तरुणाने अनेक विद्यार्थ्यांना फसवले आहे.

मुंबई: सरकारने मेघाभरती बंद केल्यापासून अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी नोकरी अभावी बेरोजगार आहेत. त्याचे वय वाढत चालले आहे. त्यामुळे मिळेल ती नोकरी स्विकारायला विद्यार्थी तयार आहेत. नोकरीची जाहीरात निघताचं लाखो तरुण अर्ज भरण्यासाठी गर्दी करतात आणि नोकरीचे स्वप्न पाहतात. काही दिवसापुर्वी आदिवासी विकास विभागाची 3 हजार पदासांठी जाहीरात निघाली होती, सोशल मीडियावर ती जाहीरात प्रचंड व्हायरल झाली होती. अनेक विद्यार्थ्यांनी विविध पदासाठी अर्ज करुन फी भरली होता. मात्र आदिवसी विकास विभागाने कोणतीही जाहीरात काढली नाही असे स्पष्ट केल्यानंतर आपण फसलो आहोत याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. बोगस जाहीराती विरोधात विद्यार्थ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

मोठी बातमी: MPSC परीक्षेसाठी तरुणांनी घातले चक्क छत्रपतींना साकडे 

पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काल तपासाची चक्रे फिरवली. जितेंद्र रामा तायडे तरुणाला जळगाव येथून नाशिक पोलिसांनी अटक केली. आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी जितेंद्र तायडे हा उच्चशिक्षित अभियंता आहे. त्यांने सिव्हिल इंजिनिअरींगची पदवी घेऊन पुणे महापालिकेमध्ये नोकरी मिळवली होती. मात्र, लवकर श्रीमंत होण्याच्या नादात तरुणाने अनेक विद्यार्थ्यांना फसवले आहे.  

मोठी बातमी: असा एक भारतीय मुस्लीम खेळाडू जो मंदीरात जातो आणि पुजाही करतो  

आरोपी जितेंद्र तायडेने आदिवासी विभागाची बनवाट डुपलीकेट वेबसाईट बनवुन जाहीरात काढली. डुप्लीकेट जाहीरातीच्या माध्यमातून परीक्षा फीच्या नावाखाली लाखो रुपये रक्कम कमवली. 216 उमेदवरांनी फसवल्याची कबुली जितेंद्रने दिली. जितेंद्र सोबत आणखी किती साथीगार आहेत याचा तपास नाशिक पोलीस करत आहे. कोणतीही जाहीरात निघाल्यानंतर त्याची सत्यता पडताळून अर्ज करावा अशी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News