पुण्याच्या तरुणाने गाजवलं दिल्लीच तख्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020
  • दिल्ली येथील मिस्टर एशिया हॅन्डसम सर्धेत प्रसाद बोगावतने मिळवले नैत्रदीप यश

पुणे: दिल्ली येथे संपन्न झालेल्या मिस्टर अँड मिस इंडिया एशिया इंटरनॅश्नल २०२० या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील भिगवण गावचा प्रसाद प्रदीप बोगावत यांने मिस्टर एशिया हॅन्डसम २०२० चा किताब जिंकला आहे. त्यामुळे पुण्याच्या तरुणाने दिल्लीचे दख्त गाजवले आहे. भिगवण सारख्या ग्रामीण भागातील प्रसादने केलेल्या या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिल्ली येथे जी. आय. ई प्रोडक्शन संस्थेच्या वतीने मिस्टर अँड मिस इंडिया एशिया इंटरनॅश्नल २०२० या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मुळ भिगवणचा असलेला व सध्या पुणे येथील सिंबॉयसिस विदयापीठामध्ये एम. बी. ए. चे शिक्षण घेत असलेल्या प्रसाद प्रदीप बोगावत यांने सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये असलेल्या सर्व फेऱ्यामध्ये चमकदार कामगिरी करत प्रसादने मिस्टर एशिया इंटरनॅश्नल हॅन्डसम २०२० किताब पटकावला. प्रसाद बोगावत हा येथील व्यावसायिक प्रदीप बोगावत यांचा मुलगा आहे. भिगवणसारख्या ग्रामीण भागातील प्रसादने मिस्टर एशिया इंटरनॅशनल हॅन्डसम सारखा मानाचा किताब मिळविल्यामुळे भिगवणध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. 

प्रसादने केलेल्या या कामगिरीबद्दल भारतीय जैन संघनटेचे जिल्हाध्यक्ष सचिन बोगावत, संदीप बोगावत, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष कमलेश गांधी व भिगवण जैन संघटनेच्या वतीने अभिनंदन केले आहे. 

याबाबत बोलताना प्रसाद बोगवात म्हणाला, जिद्द व चिकाटीने प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे या स्पर्धेतील यशाने सिध्द झाले आहे. भिगवण सारख्या ग्रामीण भागातील असुनही या स्पर्धेसाठी तयारी केली व त्यामध्ये यश खेचून आणले. स्पर्धेतील यशामुळे आत्मविश्वास मिळाला असुन पुढे मोडेलिंगच्या क्षेत्रात करीयर करण्याची इच्छा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News