कौतुकास्पद! पाय मोडूनही 'तो' पोहचला परीक्षा केंद्रात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

कोल्हापूर :सर्व महाविद्यालयांमध्ये सध्या परीक्षेचं वातावरण दिसून येत आहे. जसे परीक्षेचे दिवस जवळ येतात तसे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील आणि मनावरील तणाव वाढत असतो. आणि हाच तणाव दूर करण्यासाठी विद्यार्थी काही वेळेसाठी अभ्यास बाजूला ठेऊन खेळाकडे वळतात. म्हणूनच सतत अभ्यास करून कंटाळा आल्यामुळे  क्रिकेट खेळायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाय मोडला असूनही हा विद्यार्थी परीक्षेला गेला असल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे. 

ही घटना कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यातील पारेवाडी गावात घडली असून ललित निकम असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ललित निकम हा १२वी सायन्समध्ये शिकत आहे. रविवारी संध्याकाळी ललित अभ्यासाचा कंटाळा आल्याने मित्रांसोबत क्रिकेट खेळायला बाहेर गेला.क्रिकेट खेळत असताना ललिताचा पाय मोडला असल्याने त्याला रूग्णालायत दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान लक्षात आले की ललितच्या पायाचे हाड मोडले आहे. त्वरित ऑपेरेशन करावे लागेल  असे डॉक्टरांनी सांगितले. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारीच त्याचा भौतिकशास्त्राचा पेपरही होता त्यामुळे पेपर कसा द्यायचा हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.

यावर उपाय म्हणून ललिताच्या कुटुंबीयांनी परीक्षा केंद्राशी संपर्क करून पेपरची वेळ वाढवून घेतली. शस्त्रक्रियेनंतर ललितच्या पायाला प्लास्टर बांधले असल्याने तो तसाच रुग्णवाहिकेतून पेपर सोडविण्यासाठी परीक्षा केंद्रात गेला असून पुढील  सर्व परीक्षेचे दिवस त्याला रुग्णवाहिकेतून परीक्षा केंद्रात सोडण्याची सोय केली असून त्याच्यासाठी वेगळ्या परीक्षा कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.  

खेळाची आवड असणे स्वाभाविकच आहे. परंतु करिअरच्या दृष्टिकोनातून परीक्षेचे दिवस हे महत्वाचे असतात.  खेळ तर आपण नेहमीच खेळात असतो परंतु जर खेळात अशा प्रकारचा कोणताही अपघात झाला तर त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे नुकसान होऊ शकते. त्यामुळेच परीक्षेच्या काळात विदयार्थ्यांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News