'एवढे पैसे मिळाल्यावर कोणीही चांगलं खेळेल...' माजी क्रेकटपटूची विराटवर जहरी टीका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020
  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याचा आघाडीचा खेळाडू आहे. शतकांची खेळी करत त्याने अनेक फलंदाजांचे रेकॉर्ड मोडले आहेत. अनेक प्रतिस्पर्धी विराटची विकेट जाण्याची वाट बघतात, जेणेकरून सामना जिंकणे सोपे जाईल. परंतु सध्याची स्थिती पाहता विराटचा फॉर्म कमी झाल्याचे दिसून येत आहे.  पण तरीही जागतिक स्तरावर विराट एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याचा आघाडीचा खेळाडू आहे. शतकांची खेळी करत त्याने अनेक फलंदाजांचे रेकॉर्ड मोडले आहेत. अनेक प्रतिस्पर्धी विराटची विकेट जाण्याची वाट बघतात, जेणेकरून सामना जिंकणे सोपे जाईल. परंतु सध्याची स्थिती पाहता विराटचा फॉर्म कमी झाल्याचे दिसून येत आहे.  पण तरीही जागतिक स्तरावर विराट एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. 

एखादी व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचली तर त्याच्यावर अनेक स्तरांवरून टीका होत असतात. अशीच टीका विराट कोहलीवर करण्यात आली आहे. पाकिस्तनचे माजी क्रिकेटपटू रज्जाक यांनी "विराटला २ महिन्याला २० कोटी रुपये मिळतात म्हणून तो चांगले खेळतो" अशी घणाघाती टीका विराट कोहलीवर केली आहे.  त्यांच्या या वक्तव्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.  विराटसोबत रज्जाक यांनी वीरेंद्र सेहवागवरदेखील टीकास्त्र सोडले आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सेहवागबद्दल बोलताना रज्जाक म्हणाले की, पाकच्या संघामुळेच सेहवाग चांगली फलंदाजी करू शकला;याचं कारण म्हणजे आम्ही केलेल्या खराब क्षेत्ररक्षण. जर आम्ही खराब क्षेत्ररक्षण केलं नसते तर , सेहवाग शतकांची खेळी करू शकला नसता.  

पुढे रज्जाक यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधाविषयी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, "पाकिस्तानात उत्तम क्रिकेट खेळण्याची अधिक क्षमता आहे. याउलट भारत हा आयपीएलमुळे चांगलं खेळतो. ते वगळता भारतीय क्रिकेटपटूची खेळी ही तितकी प्रभावी नाही. कारण आयपीएल खेळण्यासाठी खेळाडूंना चांगली रक्कम मिळत असते, आणि विराटला तर २ महिन्याचे तब्बल २० कोटी रुपये मिळतात.आणि त्यामुळेच तो चांगलं खेळतो. असं वक्तव्य रज्जाक यांनी केलं 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News