वाढदिवशी केक का कापतात तुम्हाला माहित आहे का ? जाणुन घ्या

सकाळ (यिनबझ)
Friday, 17 January 2020

केक कापण्याची प्रथा सुरू तरी कुठून झाली, असा प्रश्न कधी कुणाला पडला का ? आज आपण याच केक बाबतची रोचक कथा जाणून घेऊयात.

हल्ली कुठल्या गोष्टीचं सेलीब्रेशन होईल सांगता येत नाही. आधी आनंदाची बाब असली की घरात गोडधोड बनवायचे, आता तसे राहिले नाही. त्यातच काळानुसार सेलीब्रेशन करण्याच्या पद्धतीतही बराच बदल झाला आहे. आणि सेलीब्रेशन म्हटलं की केक आलाच. सध्या आनंदाची कुठलीही बाब कळली की आपण केक कापुन तो सेलीब्रेट करतोच. मात्र, ही केक कापण्याची प्रथा सुरू तरी कुठून झाली, असा प्रश्न कधी कुणाला पडला का ? आज आपण याच केक बाबतची रोचक कथा जाणून घेऊयात.

सेलीब्रेशन हे फक्त आपल्याचकडे होते असे नाही, तर जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आनंदाचं सेलीब्रेशन होतं. मात्र जगात सेलीब्रेशन करण्यात आघाडीवर आहे तो म्हणजे इजिप्त. सुरवातीला इजिप्त 'या' देशात जन्म घेतलेला प्रत्येक माणूस हा देवाचं रूप असल्याचं समजत त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. 

मात्र केकवर आपण जसं मेणबत्ती लावुन सेलीब्रेशन करतो याचा पहिला मान रोम ला जातो. कारण केक किंवा ब्रेडवर मेणबत्ती लाुन वाढदिवस साजरा करण्याची पद्धत रोमन लोकांनी सुरवात केली. रोममध्ये वाढदिवस साजरा करण्याच्या तिन पद्धती आहेत. एक म्हणजे स्वत:सोबत, दुसरं म्हणजे जवळच्या प्रिय व्यक्ती सोबत आणि तिसरं म्हणजे सर्वांना आमंत्रीत करत त्यांच्यासह.

काही इतिहासकाराचं म्हणणं आहे की, केक कापण्याची प्रथा ही ग्रिक लोकांनी सुरू केली. खरंतर केक 15व्या शतकात लोकांसमोर आला. तिकडे जर्मनमध्ये राक्षसी शक्तीपासून वाचण्यासाठी लहान मुलांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असे.

भारतातही केक आणला तो इग्रंजानीच. इग्रंजही फक्त स्वत:साठीच केक बनवत असे. आणि मग त्यानंतर 1880 मध्ये भारतात भिस्कीटची फॅक्टरी सुरू झाली. केरळमध्ये रॉयल भिस्कीट नावाची फॅक्टरी सुरू झाली. त्यानंतर भारतात केक हा पदार्थ जास्त लोकप्रीय झाला.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News