22 तरुणांना शौर्य पुरस्कार जाहीर; जाणून घ्या त्यांच्या शौर्याची गाथा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 January 2020

कर्नाटक मध्ये पूरग्रस्त परिस्थिती झाली होती त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत तरुणाने जीव धोक्यात टाकून रुग्णवाहिकेला मार्ग दाखला अशा मुलांची शौर्य पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली.

कर्नाटक मध्ये पूरग्रस्त परिस्थिती झाली होती त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत तरुणाने जीव धोक्यात टाकून रुग्णवाहिकेला मार्ग दाखला अशा मुलांची शौर्य पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यंदा शौर्य पुरस्कारासाठी एकूण 22 मुलांची नावे जाहीर केली असून त्यात 10 मुले व 12 मुली यांचा समावेश आहे. यातील एका मुलाला मरणोत्तर पुरस्कार
देण्यात येईल. भारतीय बाल कल्याण परिषदेने (आयसीसीडब्ल्यू) शौर्य पुरस्कारची नावे जाहीर केली आहेत.

1957 पासून शौर्य पुरस्कार जाहीर

1957 पासून आयसीसीडब्ल्यू ही अशासकीय संस्था शौर्य दाखविणाऱ्या मुलांना पुरस्कार देते. आतापर्यंत 1,004 मुलांना पुरस्कार देण्यात आले आहेत, त्यातील 703 मुले आणि 301 मुली आहेत.

केरळच्या आदित्यला मिळणार उत्कृष्ट शौर्य पुरस्कार

आयसीसीडब्ल्यूचा सर्वात मोठा पुरस्कार 'भारत अवार्ड' केरळच्या आदित्यला दिला जाणार आहे. केरळमध्ये पर्यटकाच्या बसलाआग लावली, बसचा आरश तोडून 40 हून अधिक लोकांचे आदित्यने बाहेर काढले आणि त्यांचे जीव वाचवले. बसला आग लागली तेव्हा चालक बस सोडून पळून गेला, प्रवाशी बसमध्ये आडकले आहेत हे पाहून आदित्य बसमध्ये चढला. प्रसंगावधान राखत
बसची काच फोडली आणि प्रवाशांना बाहेर पडण्यास मदत केली.

केरळच्या मुहसीनला मिळणार अभिमन्यू पुरस्कार

यंदाचा अभिमन्यू पुरस्कार केरळच्या कोझिकोड येथील 16 वर्षीय तरुण महंमद मुहसीन यांना मरणोत्तर देण्यात येणार आहे. 3 एप्रिल 2019 मध्ये मुहसीनने आपल्या तीन मित्रांना वाचवले आपला जीव दिला. बुडगाम येथील 19 वर्षीय तरुण मुदासीर अशरफ आणि कुपवाडा येथील 16 वर्षीय तरुण मुहीदीन मुघल यांना शौर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. आयसीसीडब्ल्यूच्या श्रावन पुरस्कारासाठी मुगलची निवड करण्यात आली.

मोगलची शौर्य गाथा

मोगल म्हणाला, "मी कुपवाडा येथील तूमिना गावात घरी बसलो होतो. त्याचवेळी पहिल्या मजल्यावर एक गोला पडला आणि माझी खोली धुराने भरुन गेली. मी ताबडतोब तिथून उडी मारुन तळ मजल्याकडे पळत गेलो, जिथे माझे आईवडील आणि बहीण बसले होते. माझी आठ वर्षांची बहीण, सडियाला घेऊन पळ काढला. माझे पालक माझ्यामागे धावले. मग आमचे घर कोसळले."
त्यामुळे मोगल कुटुंब वाचले. 

पुरस्कारांसोबत बक्षिस मिळणार

कर्नाटकच्या 11 वर्षीय व्यकटेशने पूरग्रस्त भागात रुग्णवाहिकेला मार्ग दाखविला त्याबद्दल शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. जम्मू- काश्मीरच्या अशरफ यांनी हेलिकॉप्टर अपघातानंतर लोकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांना बक्षिसेही दिले जातील. अशरफ म्हणाला "हेलिकॉप्टरचा तुकडा गावात पडला आणि त्याला आग लागली. मी चिखल टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी होऊ शकलो नाही. मात्र मी प्रयत्न केला"

आई आणि मावशीला वाचवणाऱ्या मुलाला पुरस्कार

आई आणि मावशी ब्रह्मपुत्र नदीत बुडत होते, आपला जीव धोक्यात घालून दासने त्यांना वाचवले. त्यामुळे आसामच्या 12 वर्षीय कृष्णा दास यांना शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. 

गेल्या वर्षी पुरस्कारावरून झाला वाद

गेल्या वर्षी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारावरून वाद झाला होता. आयसीसीडब्ल्यू आणि संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने शौर्य पुरस्कार दिले जात होते. 2019 नंतर संरक्षण मंत्रालय वेगळा झाला. त्याननंतर महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय बाल पुरस्कारात शौर्य श्रेणी वाढवून तीन मुलांचा स्वतंत्र सन्मान करण्याचा निर्णय घेतला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News