तरुणांनी शेतीकडे वळणे आवश्यक . 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020
  • डॉक्‍टर, इंजिनिअरप्रमाणे तरुणांनी शेतीकडे वळावे.
  • शेतीतून अधिकाधिक फायदा मिळविता येते हे अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी सिध्द केले आहे.​

वैभववाडी :  शेती ही आपली सर्वांची गरज आहे. त्यामुळे डॉक्‍टर, इंजिनिअरप्रमाणे तरुणांनी शेतीकडे वळावे. तंत्रज्ञानामुळे शेती सोपी झाली आहे, असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी येथे केले.

येथील आत्मा समिती व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कृषी वैभवचे उद्‌घाटन सौ. नाईक यांच्या हस्ते झाले. याला उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शारदा कांबळे, अक्षता डाफळे, अक्षता जैतापकर, महेश रावराणे, नासीर काझी, सुधीर नकाशे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, स्नेहलता चोरगे, अरविंद रावराणे, दुर्वा खानविलकर, शुभदा पाटील, प्रसाद देवधर, रोहन रावराणे, अमोल आगवान, विवेक कदम आदी उपस्थित होते.

सौ. नाईक म्हणाल्या, ‘‘भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हेच या देशाचे वैभव आहे. शेती ही आजची गरज बनली आहे. तरुण ज्याप्रमाणे डॉक्‍टर, इंजिनिअरसह विविध क्षेत्राकडे वळत आहेत, त्याचप्रमाणे तरुणांनी शेती क्षेत्राकडे आपले लक्ष वळविणे आवश्‍यक आहे. तंत्रज्ञानामुळे शेती करणे सोपे झाले आहे. शेतीतून अधिकाधिक फायदा मिळविता येते हे अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी सिध्द केले आहे.’’ डॉ. देवधर म्हणाले, ‘‘तालुक्‍याला समृद्ध जंगलाचा वारसा आहे; परंतु ज्यावेळी नैसर्गीक साधनाचे रूपांतर संपत्तीत करू त्याचवेळी या परिसराचा विकास होईल. त्यामुळे भविष्यात येथील जंगलाचा वापर जंगल पर्यटनासाठी होणे आवश्‍यक आहे. ’’ या प्रदर्शनात समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, अमोल आगवान, महेश रावराणे यांनी मार्गदर्शन केले. विवेकानंद नाईक यांनी सूत्रसंचलन केले. कृषी पर्यवेक्षक श्री. साखरकर यांनी आभार मानले.

लवकरच जिल्ह्यात साखर कारखाना

श्री. म्हापसेकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात येत्या वर्षभरात नारायण राणेंच्या माध्यमातून साखर कारखाना उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्र वाढणे आवश्‍यक आहे. ऊस शेतीबद्दल शेतकऱ्यांना अद्यावत ज्ञान मिळण्यासाठी वैभववाडीत लवकरच ऊस परिषदेचे आयोजन करण्यात येईल. स्थानिक शेतकऱ्यांनी जमिनी कुणाही परप्रांतीयांना विकू नयेत. स्वत:ला शेती करता येत नसेल तर कराराने जमिनी द्या; परंतु जमिनी विकण्याचे पातक हातून घडू देऊ नका, असे आवाहन
त्यांनी केले.                        

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News