सुदृढ शरीरयष्टीसाठी तरुणाईत सप्लिमेंटची क्रेझ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020
  • भारतीय कंपन्याचे सप्लिमेंट बाजारात येऊ लागल्याने सामान्यांना परवडेल, अशा दरातदेखील सप्लिमेंट उपलब्ध आहेत. कडाक्‍याची थंडी सुरू झाल्यापासून दोन महिन्यांत साधारणतः चार ते पाच लाखांची उलाढाल झाली आहे. सर्व मालांची आयात विदेशातून होत असते.
  • शरीराला वर्कआउट करताना आवश्‍यक ती ऊर्जा व प्रोटिन मिळवण्यासाठी सप्लिमेंट मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. हिवाळ्यात साधारणतः पाच ते सहा लाखांची उलाढाल या व्यवसायातून होते. तसेच शिर्डी, मनमाड, चांदवड, मालेगाव याठिकाणी निर्यात केली जाते.
  • जखमी खेळाडूंना जखम भरून काढण्यासाठी प्रोटिन सप्लिमेंट घेण्याचा चांगला फायदा होतो. रोज सराव करताना शरीराची झीज भरून काढण्यासाठी सप्लिमेंट घेणे आवश्‍यक असते. सराव करताना कुुठल्याही प्रकारचा थकवा जाणवू नये, यासाठी खेळाडू, सायकलिस्ट, बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील तरुणांना सप्लिमेंट घेणे आवश्‍यक असते.

नाशिक : हिवाळ्यात तरुणाई आरोग्य जपण्यासाठी सकस आहारासोबतच व्यायामशाळा, जिम, झुंबा या ठिकाणी गर्दी करतात. यात फिटनेस जपण्यासाठी सप्लिमेंटचा आधार घेत असल्याचे चित्र आहे. सप्लिमेंट वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी घेतल्या जातात. काही तरुण प्रोटिनच्या कमतरतेमुळेही सप्लिमेंट घेतात. 

सुदृढ शरीर कमावण्यासाठी तरुणाईची सारखी धडपड सुरू असते. त्यासाठी अनेक जण जिमचा रस्ता धरतात. कमी वेळात दणकट शरीरयष्टी प्राप्त करायची असेल, तर सप्लिमेंट हा उत्तम पर्याय मानला जातो. यासाठी जिम प्रशिक्षकदेखील सप्लिमेंटचा सल्ला देतात.

बाजारात सध्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सप्लिमेंटमध्ये प्रोटिन बार, चिप्स, ओट्‌स, ड्रायफ्रुटस, चॉकलेट, ज्यूस, कॅडबरी यांची भर पडली आहे. ज्यांना रोजच्या आहारातून पुरेसे प्रोटिन मिळत नाहीत, ते प्रोटिन सप्लिमेंटचा वापर करतात. जिममध्ये वेट प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना हे घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे त्यांच्या स्नायूंमधील नुकसान भरून निघते, वेटलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना याचा विशेष फायदा होतो. त्याचसोबत इतर पोषणमूल्यांची देखील तितकीच गरज भासते. 

असे आहेत दर

फिश ऑइल ६०० ते २००० रुपये
कॅल्शिअम २०० ते ४०० रुपये
व्हे प्रोटिन २८०० ते ३७०० रुपये
बीसीएए १५०० ते ३५०० रुपये
मल्टीव्हिटामिन ६०० ते २००० रुपये

 

विदेशातून आयात

उच्च प्रतीचे सप्लिमेंट विदेशातून आयात केले जाते. युरोप, अमेरिका याठिकाणच्या सप्लिमेंटची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. तर मुंबई, पुणे, दिल्ली येथील सप्लिमेंटदेखील खरेदी केल्या जात आहेत. तसेच शहरातील व्यावसायिक हे सप्लिमेंट शहरासह मालेगाव, धुळे, नंदुरबार, शिर्डी, नगर येथे निर्यात करतात.

तीन प्रकारचे प्रोटिन

प्रोटिन कॉन्सन्ट्रेट, प्रोटिन आयसोलेट, प्रोटिन हायड्रोलीसेट हे तीन मुख्य प्रकार आहेत. त्यात व्हे प्रोटिनमुळे, सोया प्रोटिन, कैसियन प्रोटिन, एग प्रोटिन, पी प्रोटिन, राइस प्रोटिन, हेम्प प्रोटिन, मास ग्रेनर, फिश ऑइल, कॅल्शियम, बी.पी.ए.ए.यामधून शरीरास फॅटस, मिनरल्स, पाणी, कार्बोहायड्रेट हे प्रोटिन्स मिळतात. साधारणतः थंडीच्या दिवसात शहरात चाळीस ते पन्नास लाखांची उलाढाल सप्लिमेंटच्या व्यवसायातून होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News