जलतरणपटू स्वराली म्हात्रेने रचला नवीन विक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020

या अगोदर तिने आपला सागरी जलतरणातील साहसी विक्रम नोंदवला असला तरी धरमतर ते गेटवे हे अंतर नऊ तासांत पार करून नवा विक्रम करण्याचा प्रयत्न तिने केला होता

अलिबाग : धरमतर ते गेटवे हे सागरी अंतर १२ तास ३९ मिनिटांत पार करून स्वराली म्हात्रे हिने साहसी कामगिरी केली. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

सागरी जलतरण साहसी विक्रम नोंदवण्यासाठी पेणच्या स्वराली म्हात्रे हिने सकाळी ४ वाजून ४३ मिनिटांनी धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी अंतर पोहण्यास सुरुवात केली. या अगोदर तिने आपला सागरी जलतरणातील साहसी विक्रम नोंदवला असला तरी धरमतर ते गेटवे हे अंतर नऊ तासांत पार करून नवा विक्रम करण्याचा प्रयत्न तिने केला होता; परंतु तिने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे ३६ किलोमीटरचे अंतर १२ तास ३९ मिनिटांत यशस्वीपणे पार केले.

या वेळी तिच्यासोबत महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना व पेण तालुका हौशी जलतरण संघटनेचे प्रशिक्षक हिमांशू मलबारी, सचिन शिंगरुत, अनिल कनघरे, ओपन वॉटर सी स्वीमिंगचे अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी सुनील पाटील, निरीक्षक नील लब्दे, बालकृष्ण म्हात्रे, जयश्री म्हात्रे, अध्यक्ष पी. एम. म्हात्रे आदी उपस्थित होते. स्वराली ही पेण प्रायव्हेट हायस्कूल अँड जुनिअर कॉलेजच्या बारावीत शिक्षण घेत आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News