विद्यार्थ्यांमध्ये वाचनाच्या गोडीसाठी 'रूम टू रीड'चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 March 2020
  • सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे तरुण पिढीसह विद्यार्थ्यांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे.

नागपूर  : सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे तरुण पिढीसह विद्यार्थ्यांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांची भाषाविषयक समज पक्की व्हावी, त्यांची आकलनक्षमता वाढावी, यासाठी ‘रूम टू रीड’ आंतरराष्ट्रीय संस्थेने पुढाकार घेतला आहे. नव्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील तीन हजार २७७ शाळांमध्ये ‘रीड टू रूम’ उपक्रम सुरू होणार आहे.  

‘रूम टू रीड संस्थेतर्फे पहिल्या टप्प्यात सिन्नर, नाशिक, त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्‍यांत हा उपक्रम काम सुरू असून, ७८४ जिल्हा परिषद शाळांतील पाच हजारांहून अधिक विद्यार्थी वाचनाचा आनंद घेत आहेत. उपक्रमाची यशस्विता पाहता ‘रूम टू रीड’ आणि शिक्षण विभागाच्या विद्या प्राधिकरणात सामंजस्य करार झाला.

जिल्ह्यातील पंधरा तालुक्‍यांमध्ये चार वर्षांसाठी टप्प्याटप्प्यात संस्था काम करीत आहे. मुलांना वाचनासाठी पुस्तके देणे एवढेच काम नाही, तर त्यांचे आकलन वाढावे, यासाठी संस्था मुळाक्षरांपासून मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी केंद्र स्तरावर ग्रंथालय सुरू केले आहे. 

पहिल्या टप्प्यात पाच हजारांवर विद्यार्थी घेताहेत वाचनाचा आनंद असा आहे संस्थेचा पसारा 

‘रूम टू रीड’ संस्था दहा देश व भारतातील महाराष्ट्रासह सहा राज्यांत वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. ग्रंथालयनिर्मिती त्याचाच भाग असून, प्रत्येक ग्रंथालयात कार्टून स्वरूपातील चित्रांच्या पुस्तकांपासून सर्व वयोगटांना भावतील, अशा विविध विषयांवरील पुस्तके शाळांना देण्यात येणार आहेत. मुलांना पुस्तकातील गोष्टी कशा सांगायच्या व त्यांची गोष्टींमधील गोडी कशी वाढवायची, यासाठी संस्थेतर्फे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News