'या' महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यीनीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 March 2020
  • आतापर्यंतचे सर्वांत मोठे डेस्क कॅलेंडर तयार केल्याने लिम्का बुक ऑफ रॅकार्ड या संस्थेने प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे.

पंढरपूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असलेल्या रेवती रवी सोनार हिने सर्वांत मोठे डेस्क कॅलेंडर तयार केले आहे. या कॅलेंडरची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेऊन प्रमाणपत्र देऊन तिचा नुकताच गौरव केला.डेस्क कॅलेंडरची उंची सात फूट आणि रुंदी १० फूट आहे.

एकूण ७० फूट चौरस क्षेत्रफळ असून सात पृष्ठांचे हे कॅलेंडर पंढरपुरात आकर्षण आणि कौतुकाचा विषय झाले आहे. पहिल्या पृष्ठावर वर्षभरातील १२ महिन्यांचे दिनांक व वार आहेत. उर्वरित सहा पृष्ठांवर सामाजिक कार्यकर्ते, विश्‍वविक्रमवीर कवी व रवी सोनार यांची बहीण या विषयावरील सुविचार आहेत. एक लोखंडी फ्रेम तयार करून त्यावर डेस्क कॅलेंडर चिकटवण्यात आले आहे. कॅलेंडरमधील सर्व पृष्ठे महिन्यानुसार बदलणे शक्‍य आहेत.

आतापर्यंतचे सर्वांत मोठे डेस्क कॅलेंडर तयार केल्याने लिम्का बुक ऑफ रॅकार्ड या संस्थेने प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे. या डेस्क कॅलेंडरचे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी रेवती सोनार हिचे प्रयत्न सुरू आहेत. तिचे हे आगळेवेगळे कॅलेंडर पाहण्यासाठी शहरातील विद्यार्थी व नागरिक गर्दी करू लागले आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News