आता तरूणांना मिळणार करिअर घडवण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना एका ठिकाणी एका दिवसात नोकर भरतीची माहिती मिळावी आणि नियुक्तीसाठी भरती प्रक्रियेला सामोरे जाता यावे या हेतूने शैक्षणिक व करिअर फेअरचे आयोजन केले होते.

अलिबाग : करिअर फेअरसारख्या उपक्रमातून बेरोजगार तरुणांना संधी निर्माण होत आहे. यातून भविष्य घडवायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. आस्वाद पाटील यांनी येथे केले.

जेएसएम महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करिअर फेअरच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जनता शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. गौतम पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. नीळकंठ शेरे, उपप्राचार्य प्रा. अविनाश ओक, ओएसडी प्रा. सुरेंद्र दातार उपस्थित होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना एका ठिकाणी एका दिवसात नोकर भरतीची माहिती मिळावी आणि नियुक्तीसाठी भरती प्रक्रियेला सामोरे जाता यावे या हेतूने शैक्षणिक व करिअर फेअरचे आयोजन केले होते.

या वेळी तरुणांना विविध स्तरावरील अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षा याबद्दल तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन व्हावे या दृष्टीने व्याख्यानमालिकेचे आयोजनही केले होते. या वेळी सुहास पाटील, अंकुश जाधव, सोनाली कदम आदींनी तरुणांना मार्गदर्शन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News