'या' गोष्टीमुळे त्याने केला युवकावर वार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

ही घटना रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली घटनेसंदर्भात शहर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूर्तिजापूर : स्टेशन विभागात भाजीपाल्याचे दुकान चालवित असलेल्या युवकास त्याच विभागात राहणाऱ्या कपिलरत्न शितोळे याने हातातील धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली घटनेसंदर्भात शहर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार स्टेशन विभाग परिसरात संजय रत्नराव जांभळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपले भाजीपाला विक्रीचे दुकान  बंद करुन ते दुकानांसमोर उभे असताना याच विभागात राहणाऱ्या आरोपी कपिलरत्न शितोळे याने येऊन गांजासाठी पैशाची मागणी केली. संजय जांभळे यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी कपिलरत्न याने त्यांच्याजवळ लपवून ठेवलेल्या धारदार शस्त्राने वार करुन जखमी केले. यावरून पोलिसांनी आरोपी कपिलरत्न शितोळे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News