युवकांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य दिशेची गरज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले शेतकरी शेतमजुरांचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना येथे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. यासाठी त्यांना व्यावसायिक क्लासेसचा सहारा घ्यावा लागतो.

औरंगाबाद : मराठवाड्यातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता असून, योग्य दिशा मिळाल्यास स्पर्धा परीक्षेचे शिखर ते सहज गाठू शकतात, असे प्रतिपादन अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विलासराव देशमुख अध्यासनातर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते.

भूगोल विभागाच्या सभागृहात कार्यशाळा झाली. प्रा. सतीश वसे, प्रा. इद्रिस पठाण, प्रा. संजय खंदारे, प्रा. बाळासाहेब शिंदे, प्रा. विजयकुमार झांबरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेच्या उद्‍घाटनास सामाजिकशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सतीश दांडगे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती.

विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले शेतकरी शेतमजुरांचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना येथे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. यासाठी त्यांना व्यावसायिक क्लासेसचा सहारा घ्यावा लागतो. तिथे हे विद्यार्थी पैसे भरू शकत नाहीत. त्यांना येण्या-जाण्यासाठी गैरसोय होते. त्यांची ही आवश्यकता व गरज लक्षात घेऊन विलासराव देशमुख अध्यासन केंद्राच्या वतीने या दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी प्रा. सतीश वसे यांनी गणिताविषयी तर, इद्रिस पठाण यांनी चालू घडामोडींवर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रा. संजय खंदारे यांनी राज्यघटना व पंचायत राज याविषयी तर, विजयकुमार झांबरे यांनी इंग्लिशसंबंधी मार्गदर्शन केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News