आविष्कार संशोधन स्पर्धेत तरूणींनीच  मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 February 2020
  • आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. विद्यापीठाच्या प्राथमिक फेरीत निवड झालेल्या सहा स्पर्धकांनी मुंबई येथे झालेल्या या अंतिम स्पर्धेत सहभाग नोंदविला.

नाशिक : आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. विद्यापीठाच्या प्राथमिक फेरीत निवड झालेल्या सहा स्पर्धकांनी मुंबई येथे झालेल्या या अंतिम स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, एकाने द्वितीय क्रमांक पटकावला. तर अन्य दोन विद्यार्थ्यांनी नेहरू विज्ञान केंद्राकडून इनोव्हेशन ॲवॉर्ड पटकावले आहे. 

आंतरविद्यापीठ आविष्कार स्पर्धेत विजेत्यांचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी अभिनंदन केले. विद्यापीठातर्फे या स्पर्धेत वाणिज्य व्यवस्थापन व विधी विभागात पुण्याचे टिळक आयुर्वेद महाविद्यालयाची डॉ. अस्मिता नारकर आणि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागातील पदव्युत्तर गटात नगरचे डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची डॉ. शरमीन वझीफदार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मानव्यविद्या, भाषा, ललितकला विभागात मुंबईचे पी. डी. हिंदुजा परिचर्या महाविद्यालयाचे डॉ. सिमेन झेविअर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तंत्रज्ञान विभाग आणि औषधी द्रव्ये व औषध निर्माणशास्त्र विभागातील डॉ. अपूर्व शिंपी, डॉ. ईशा बेरडे यांना नेहरू विज्ञान केंद्राच्या इनोव्हेशन ॲवॉर्डने गौरविले.

अंतिम स्पर्धेसाठी पाच विविध गटांतून एकूण तीस विद्यार्थी विद्यापीठातर्फे सहभागी झाले होते. यामध्ये पोस्टर किंवा मॉडेल सादरीकरण आणि मौखिक सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या नवकल्पकतेतून साकारलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांना पूर्वप्रशिक्षण शिबिरात विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. खामगावकर, मविप्र संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदीप सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेसाठी विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रभारी संचालक संदीप कुलकर्णी, बाळासाहेब पेंढारकर, प्रशांत शिवगुंडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. शर्मिला सूर्यवंशी, किशोर पाटील, राजेश इस्ते, स्मिता करवल, आबाजी शिंदे, विजय बच्छाव आदींनी परिश्रम घेतले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News