तरुणांनो, संघर्षाला घाबरु नका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020

‘‘ज्या क्षेत्रात काम करायचे आहे तिथे स्वतः सगळा अभ्यास करून माहिती मिळवून तयारीनिशी उतरले पाहिजे. स्पर्धा आहे म्हणून घाबरू नका. स्पर्धेत उडी मारा आणि आपली जागा पक्की करा.

सोमेश्वरनगर : यशस्वी व्हायचे असेल, तर प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवा. दैव, नशीब, वास्तुदोष असले काही नसते. यासारख्या अवैज्ञानिक गोष्टींवर अवलंबून न राहता प्रयत्नवादी बनणे आवश्‍यक आहे. मीही कष्टाच्या आणि सतत अभ्यासाच्या जोरावरच देशात सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्वोत्कृष्ट दूध बनवू शकलो, असा सल्ला त्रिमूर्ती उद्योगसमूहाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सावंत 
यांनी दिला. 

वाणेवाडी  येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कै. बाबूराव घोलप यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ‘उद्योजकता विकास’ या विषयावर ते बोलत होते. रामचंद्र चव्हाण अध्यक्षस्थानी होते. या वेळी शौकत संदे, धनंजय फरांदे, अरुण घोडके, प्राजक्ता यादव, सीमा पवार उपस्थित होत्या. डॉ. सावंत म्हणाले, ‘‘ज्या क्षेत्रात काम करायचे आहे तिथे स्वतः सगळा अभ्यास करून माहिती मिळवून तयारीनिशी उतरले पाहिजे. स्पर्धा आहे म्हणून घाबरू नका. स्पर्धेत उडी मारा आणि आपली जागा पक्की करा.

मीही पंधरा वर्षे अभ्यास करून, त्या क्षेत्रात काम करून दूध डेअरीच्या व्यवसायात उतरलो. आज देशातला पहिल्या दर्जाचे दूध देणारा प्रकल्प असून, नेदरलॅंडच्या पंतप्रधानांनीही कौतुक केले आहे.’’ केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी माझे तोंड भरून कौतुक केले होते. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता, अशी भावना डॉ. सावंत यांनी व्यक्त केली. महेश भागवत यांनी प्रास्ताविक केले. रामचंद्र भोसले यांनी सूत्रसंचालन केले. राणी बालगुडे यांनी आभार मानले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News