तरुणींनी  शारीरिकच नव्हे, मानसिकदृष्ट्याही सक्षम बनावे,

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 February 2020
  • महिलांवरील अत्याचाराचे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर, महिलांनी आणि तरुणींनी स्वसंरक्षणासाठी पुढे यावे.

लातूर : हिंगणघाट येथील भरचौकात पेट्रोल टाकून प्राध्यापक तरुणीला पेटवून देण्यात आले. असाच प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमध्येही घडला. दोन्ही घटनांतील पीडिता मृत्यूशी झुंज देत आहेत. महिलांवरील अत्याचाराचे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर, महिलांनी आणि तरुणींनी स्वसंरक्षणासाठी पुढे यावे. केवळ शारीरिकच नव्हे, मानसिकदृष्ट्याही सक्षम बनावे, असा सल्ला पोलिस आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी दिला.

स्वसंरक्षण व आरोग्य जाणीव जागृती या विषयावर दयानंद कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित आली होती. यात पोलिस निरीक्षक वर्षा दंडिमे व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा बरमदे यांनी उपस्थित महिलांशी आणि तरुणींशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीराम सोळंके होते. दंडिमे यांनी विविध कायदेविषयक माहिती सांगितली. विविध गुन्ह्यांचे प्रकार व त्याचे परिणाम याविषयी माहिती दिली.

प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी मुलींनी स्वसंरक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.  डॉ. बरमदे यांनी वयात येणाऱ्या मुलींबरोबर मनमोकळा संवाद साधला. समतोल आहार, योग्य व्यायाम, सकारात्मक विचार, बाहेरील खाद्यपदार्थांवर नियंत्रण, त्याचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम याविषयी जागरूक असायला हवे, असेही त्या म्हणाल्या. पर्यवेक्षिका डॉ. अंजली बुरांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अर्चना गुंजाळ व सुवर्णा कारंजे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक प्रा. सुभाष मोरे यांनी आभार मानले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News