परभणीत सुरु होणार विद्यार्थ्यांचा महामोर्चा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020

विद्यापीठातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ वसतिगृह उपलब्ध करावे, विद्यापीठातील सर्व शाखांची वाढवलेले शुल्क कमी करावे, कृषी पदव्युत्तर पदवीला पूर्ण व्यावसायिक दर्जा घोषित करा, कृषी शिक्षण परीक्षांचा निकाल ४५ दिवसांच्या आत लावावा,

परभणी : वसतिगृहासह विविध मागण्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांना निवेदन देत बुधवार पासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या वेळी विद्यापीठ स्तरावरील मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याचे अश्वासन दिले आहे.

विद्यापीठातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ वसतिगृह उपलब्ध करावे, विद्यापीठातील सर्व शाखांची वाढवलेले शुल्क कमी करावे, कृषी पदव्युत्तर पदवीला पूर्ण व्यावसायिक दर्जा घोषित करा, कृषी शिक्षण परीक्षांचा निकाल ४५ दिवसांच्या आत लावावा, चौथ्या सत्रातील विद्यार्थ्यांची नियमि शैक्षणिक सहल काढण्यात यावी, २०१८-१९ या वर्षातील विलंबित पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता रद्द न करता सर्व विद्यार्थ्यांना अदा करावा, परभणी येथील उद्यान विद्या महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्य नियुक्त करावेत, विद्यापीठातील २०१८-१९ या वर्षातील विलंबित ईबीसी शुल्कशिवाय अदा करावी, अशा विविध २२ मागण्यांचे निवेदन सोमवारी दिले. त्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने कुलगुरू कार्यालयासमोर जमा झाले होते.

या वेळी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी विद्यापीठ प्रशासनासोबत चर्चा केली. या वेळी विद्यापीठ स्तरावरील मागण्या सोडविण्याचे अश्वासन कुलगुरू डॉ. ढवण यांनी दिले आहे. तरीदेखील अन्य महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण परिषदेशी आणि राज्य शासनाशी निगडित मागण्यांबाबत बुधवारी (ता. पाच) आंदोलन करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News