मुंबई विद्यापीठाच विभाजन होणार ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

विद्यापीठ स्थापन करण्यासाठी नेमलेल्या समितीने कोकणातील महाविद्यालयांच्या संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा विचार लवकरच संपुष्टात येण्याची शक्‍यता आहे. विद्यापीठ स्थापन करण्यासाठी नेमलेल्या समितीने कोकणातील महाविद्यालयांच्या संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या वेळी त्यांनी मुंबई विद्यापीठापासून कोकणातील महाविद्यालये तोडण्यास नकार देत करिअरच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठालाच पसंती दिली आहे. यामुळे कोकणातील महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न ठेवण्याचा पर्यायी विचार समितीकडून सुरू असल्याचे समजते. मुंबई विद्यापीठावर येणारा प्रशासकीय भार कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड येथील महाविद्यालयांकरिता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती गठित केली आहे. यासाठी मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. 

गठित समितीमधील सदस्यांकडून कोकणातील ८७ महाविद्यालयांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना कोकण विद्यापीठाबाबत मते नोंदवण्यासाठी विशेष मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपवर सुमारे २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी मते व्यक्त केली आहेत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News