‘हिरकणी’ पथकाला घेऊन मनोहर मनसंतोष गडावर फडकणार तिरंगा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 January 2020

शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रसिद्ध गिर्यारोहक रामेश्‍वर सावंत व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावीस युवतींची ही मोहीम महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असून खूपच थरारक अनुभव देणारी असेल,

माणगाव : शिवापूर येथील मनोहर मनसंतोष गडावर प्रजासत्ताकदिनी तिरंगा फडकवला जाणार आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रसिद्ध गिर्यारोहक रामेश्‍वर सावंत व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावीस युवतींची ही मोहीम महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असून खूपच थरारक अनुभव देणारी असेल, असे रामेश्‍वर सावंत यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘१८४५ चे मराठ्यांचे बंड मोडून काढत ब्रिटिशांनी बंडाचे केंद्रस्थान ठरलेल्या मनोहर गडावर युनियन जॅक फडकवला. त्या घटनेला येत्या २६ जानेवारीला १७५ वर्ष पूर्ण होत आहेत. नेमक्‍या याच दिवसाचे औचित्य साधून ‘सिंधुसह्याद्री ॲडव्हेंचर क्‍लब’ या संस्थेने या मोहीमेचे आयोजन केले आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवापूर व गोठवे वाडीतील वंशजांना घेऊन मनोहर गडावर आणि गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतलेल्या युवती ‘हिरकणी’ पथकाला घेऊन मनसंतोष गडावर तिरंगा फडकवण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेला शिवापूर व गोठवे वाडीतील ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.’’

युवतींच्या हिरकणी पथकात नेहा गंगावणे, अश्‍विनी गोगटे, निता नवार, स्नेहा, हर्षाली चव्हाण,सरिता यमकर, किरण डोर्लेकर, श्रावणी साटम, भैरवी गवस, अर्चना गोरे (कुडाळ), सरोज परब (वेंगुर्ले), शिल्पा साटम, दिप्ती मोरे, सुप्रिया पाटील (मालवण), आकांक्षा सारंग (देवगड), सुप्रिया पाटील, स्वरदा सावंत, भारती बाकरे, सावनी लाड, शिवानी लाड, सेजल लाड, गार्गी सावंत (गोठवे) तसेच इश्‍वरी सोनगरे व अंजली माहुरे या युवतींचा सहभाग आहे. गडावर प्रजासत्ताकदिनी गडकरी व हिरकणी पथकाकडुन तिरंगा फडकवण्याची ही एक ऐतिहासिक नोंद होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News