दुसऱ्या कसोटीसाठी वगळायचे कोणाला ? विराट , केन समोर मोठा प्रश्न

सुनंदन लेले
Thursday, 27 February 2020

 पहिल्या कसोटीतील एकतर्फी निकालानंतर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसमोर आता दुसऱ्या कसोटीसाठी कोणाला घ्यायचे आणि कोणाला वगळायचे, असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.

ख्राईस्टचर्च : पहिल्या कसोटीतील एकतर्फी निकालानंतर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसमोर आता दुसऱ्या कसोटीसाठी कोणाला घ्यायचे आणि कोणाला वगळायचे, असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.

दुसऱ्या कसोटी सामन्याअगोदर दोन दिवस भारतीय संघाला सरावाला मिळणार आहेत. या सरावातून विराट कोहलीला सामन्याला कोणाला खेळवायचे, हा निर्णय घ्यावा लागणार आहे. तसे बघायला गेले तर पहिल्या सामन्यात ईशांत शर्मा सोडून कोणत्याच खेळाडूचा खेळ मनाजोगा झाला नाही.

दुसरीकडे केन विल्यमसनला वेगळीच चिंता आहे. संघाचा अत्यंत महत्त्वाचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नर पहिल्या कसोटीच्या वेळी आपल्या पहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत पत्नीसोबत थांबला होता. वॅग्नर नसल्याने कायल जेमीसनला संधी मिळाली, ज्याचे त्याने सोने केले. आता दुसऱ्या कसोटीत वगळायचे कोणाला, हा गहन प्रश्‍न केन विल्यमसनला पडला आहे.

आमचे वेगवान गोलंदाज आळीपाळीने आजारी पडत होते. आता अचानक सगळेच तंदुरुस्त होऊन निवडीकरता उपलब्ध आहेत. नील वॅग्नर महत्त्वाचा खेळाडू आहे आणि कायल जेमीसनने शानदार पदार्पण केले आहे. म्हणून दुसऱ्या कसोटीत कोणा गोलंदाजांना संघात जागा द्यायची, हा कठीण निर्णय मला घ्यायचा आहे.’’  असे केन विल्यमसन म्हणाला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News