अमूल्य ठेवा जपण्यासाठी ग्रामस्थ उभारणार वस्तुसंग्रहालय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

साई कोंड गावाच्या परिसरात अनेक वेळा प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. त्यामुळे या भागात समृद्ध संस्कृती नांदत असावी, असा अंदाज आहे.

माणगाव : शिवमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खोदकाम करताना प्राचीन मूर्ती आणि शिलालेख सापडेल्यामुळे साई कोंड गावाकडे शेकडो पर्यटक, अभ्यासकांची पावले वळू लागली आहेत. ग्रामस्थांनीही हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

साई कोंड गावाच्या परिसरात अनेक वेळा प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. त्यामुळे या भागात समृद्ध संस्कृती नांदत असावी, असा अंदाज आहे. याच भागातील चांदोरे परिसरात उत्खनन करताना ऐतिहासिक नाणी आणि अन्य साधने सापडली होती. साई कोंडमध्ये मंदिराचे प्राचीन भाग, मूर्ती, विरगळ, सतीशिळा, द्वारशाखा, भग्न खांब, उंबरे, नंदी, गणेशमूर्ती आदी अमूल्य ठेवा सापडला आहे. त्यामुळे इतिहासप्रेमींमध्ये कुतूहल आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News