क्रिकेट स्पर्धेत विक्रमगड संघाचा दणदणीत विजय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 7 March 2020
  • विक्रमगड संघाकडून अविनाश रामदे याने सलग तीन वेळा सामनावीर किताब जिंकला; तर सोमनाथ बोचल यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून  सन्मानित करण्यात आले.

विक्रमगड : भिवंडी (सोनाळे) येथे नुकत्याच झालेल्या साने गुरुजी शासकीय कर्मचारी क्रिकेट स्पर्धेत विविध खात्यातील कर्मचाऱ्यांनी उत्तम खेळ दाखवला. अंतिम सामन्यात विक्रमगड संघाने भिवंडी महापालिकेच्या संघावर मात करून प्रथम क्रमांक पटकावला.

विक्रमगड संघाकडून अविनाश रामदे याने सलग तीन वेळा सामनावीर किताब जिंकला; तर सोमनाथ बोचल यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत भिवंडी महापालिकेने द्वितीय, मालिकावीर शरद (साने गुरुजी संघ, भिवंडी) उत्कृष्ट फलंदाज विशाल (भिवंडी महापालिका संघ) यांना गौरवण्यात आले.

विक्रमगड संघाकडून पंढरी भोईर, नवनाथ कुंदे, राजेंद्र काळे, अजित जाधव, संजय गायकवाड यांनी विशेष कामगिरी केली; तर प्रशांत नडगे यांनी संघाचे नेतृत्व केले. मार्गदर्शक म्हणून भगवान कुरकुटे,  रोहिदास वाघ यांनी काम पाहिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News