विरारमध्ये 'स्लो सायकलिंगचा' अनोखा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

स्पीडमध्ये सायकलिंग करणे सर्वांनाच जमते; पण आपला बॅलन्स सांभाळून एकदम स्लो सायकलिंग करणे सर्वांच्या आवाक्‍यातील नसते.

नालासोपारा : विरारमध्ये प्रथमच ‘यंग स्टार ट्रस्ट’च्या माध्यमातून ट्रस्टचे समन्वयक अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक हार्दिक राऊत यांनी स्लो सायकलिंग स्पर्धेचे रविवारी  आयोजन केले होते. या स्पर्धेत वसई-विरारसह मिरा-भाईंदर परिसरातील ३०० च्या वर स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

विरार पश्‍चिमेच्या विराटनगर ग्राऊंडवर सकाळी ७.३०ते ८ च्या सुमारास या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक, महिला यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पीडमध्ये सायकलिंग करणे सर्वांनाच जमते; पण आपला बॅलन्स सांभाळून एकदम स्लो सायकलिंग करणे सर्वांच्या आवाक्‍यातील नसते. स्लो सायकलिंग करताना आपली मानसिक एकाग्रता ठेवणे आवश्‍यक असते. त्यामुळे आपल्या बुद्धीला चालना मिळते, आपली एकाग्रता वाढते. त्यातून आपली स्वतःवरील नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढते. आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्ती बनतो, हा संदेशही यातून देण्याचा प्रयत्न संयोजकांकडून करण्यात आला आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News