उदगीरला सव्वीस केंद्रांवर साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

शहरातील संग्राम स्मारक विद्यालय विद्यालय (३०७), विद्यावर्धिनी हायस्कूल (२३९ ), लाल बहादूर शास्त्री विद्यालय (२३९), श्यामलाल मेमोरियल हायस्कूल (२३९), शामार्य कन्याविद्यालय (२३९), अलअमीन उर्दू हायस्कूल ( २३९), जिल्हा परिषद प्रशाला ( २३९), दुर्पतमाता अनुसूचित जाती आश्रमशाळा (२३९), राजश्री शाहू विद्यालय ( २३९) या नऊ परीक्षा केंद्रावर मराठी माध्यमातील दोन हजार ३३३ तर उर्दू माध्यमाची ४३२ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती सहायक परिरक्षक बालाजी धमनसुरे यांनी दिली.

उदगीर : लातूर विभागीय माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा सुरू झाल्या आहेत.या परीक्षेत उदगीर शहरातील नऊ तर ग्रामीण भागातील सतरा परीक्षा केंद्रावर सहा हजार ५५४ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.

शहरातील संग्राम स्मारक विद्यालय विद्यालय (३०७), विद्यावर्धिनी हायस्कूल (२३९ ), लाल बहादूर शास्त्री विद्यालय (२३९), श्यामलाल मेमोरियल हायस्कूल (२३९), शामार्य कन्याविद्यालय (२३९), अलअमीन उर्दू हायस्कूल ( २३९), जिल्हा परिषद प्रशाला ( २३९), दुर्पतमाता अनुसूचित जाती आश्रमशाळा (२३९), राजश्री शाहू विद्यालय ( २३९) या नऊ परीक्षा केंद्रावर मराठी माध्यमातील दोन हजार ३३३ तर उर्दू माध्यमाची ४३२ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती सहायक परिरक्षक बालाजी धमनसुरे यांनी दिली.

परिरक्षक क्रमांक  १४८ अंतर्गत उद्देश्वर विद्यालय सावरगाव ( २३९), माध्यमिक आश्रम शाळा चिंचोली आतनूर (३१२), जिल्हा परिषद विद्यालय नळगीर (१६८), चंगळामाता पोस्ट बेसिक आश्रम शाळा जानापूर (१९०), नरसामाता पोस्ट बेसिक आश्रम शाळा नावंदी ( २१०), जिजामाता विद्यालय तोंडचीर ( १८६), (कै)बाबासाहेब नाईक विद्यालय वागदरी(२४७), माध्यमिक आश्रम शाळा बोरताळा पाटी (२६८) या आठ परीक्षा केंद्रावर एक हजार ८२० परीक्षार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती परिरक्षक एस.टी.शिंदाळकर यानी दिली आहे.

परीरक्षक क्रमांक १४९  अंतर्गत जिल्हा परिषद प्रशाला देवर्जन ( २०९), जिल्हा परिषद प्रशाला गुडसूर ( २९२ ), निर्मल पुरी विद्यालय हेर (१८३ ), जिल्हा परिषद प्रशाला वाढवणा (२२२), पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय तोगरी (२९२), नेहरू मेमोरियल हायस्कूल तोंडार ( २३२),  ब्राईट स्टार पब्लिक स्कूल बिदर रोड उदगीर ( २५०), समर्थ माध्यमिक विद्यालय एकुरका रोड (२४३ ), स्वामी दयानंद सरस्वती विद्यालय भाकसखेडा ( २०६ ) असे एकूण एक हजार ९६९  परीक्षार्थी परीक्षा देत असल्याची माहिती परिरक्षक एस एस पारसेवार यांनी
दिली आहे.

कॉपी विरहित परीक्षा हवी

बारावी परीक्षेत काही ठिकाणी कॉप्या होत असल्याचे प्रकार चर्चेत आले. मात्र दहावी परीक्षेत माध्यमिक परीक्षा मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची अपेक्षा पालकांतून व्यक्त करण्यात येत आहे. मंडळांने विद्यार्थ्यांपेक्षा बैठे पथकाकडे लक्ष ठेवण्याची मागणी पालकांनी केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News