राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरूवात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 February 2020

परीक्षा केंद्रांवर तांत्रिक साहित्य घेऊन जाण्यास विद्यार्थ्यांना बंदी आहे तर शिक्षकांचे मोबाईल फोन केंद्रावर एका ठिकाणी ठेवले जातील. यामुळे पेपरफुटी प्रकरणावर नियंत्रण आणण्याचा विचार आहे. 

औरंगाबाद : बारावीच्या परीक्षेला आजपासून  सुरवात होत आहे. १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत बारावीच्या परीक्षा होणार आहेत. औरंगाबाद विभागातील बीड, जालना, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून ४०६ केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी एक लाख ७१ हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 

बारावी परीक्षेसाठी विभागातून ५८ परिरक्षकांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यासाठी सहा-सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी, तसेच महिलांचे एक विशेष पथक काम करणार आहे. शिवाय विभागीय मंडळात हेल्पलाइन तयार करण्यात आली असून विद्यार्थ्यांना, पालकांना येणाऱ्या अडचणींबाबत त्यावर २४ तास मार्गदर्शन करण्यात येईल. परीक्षा केंद्रांवर तांत्रिक साहित्य घेऊन जाण्यास विद्यार्थ्यांना बंदी आहे तर शिक्षकांचे मोबाईल फोन केंद्रावर एका ठिकाणी ठेवले जातील. यामुळे पेपरफुटी प्रकरणावर नियंत्रण आणण्याचा विचार आहे. 

परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी यावे

बारावीची परीक्षा सकाळी ११ ते २ दुपारी आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या दोन सत्रांत होणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर विद्यार्थांनी यावे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वाचन करण्यासाठी देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या सूचना 

परीक्षेला वेळेवर उपस्थित राहावे.मोबाईल, स्मार्ट वॉच यासह कोणतेही उपकरण परीक्षेसाठी नेण्यास प्रतिबंध 
दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेला कॅल्क्‍युलेटर वापरण्यास संमती

जिल्हा        परीक्षा केंद्र  परिरक्षक केंद्र नियमित विद्यार्थी 
औरंगाबाद    १४२    २१    ६२,७९२ 
 बीड     ९७     १४      ४०,६५१
 जालना     ७३      १०     ३०,८१४ 
 परभणी       ६१    ०८    २४,४५४ 
  हिंगोली     ३३      ०५     १३,२४८

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News