वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात आजपासून श्रमसंस्कार शिबिर सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

पर्यावरण संवर्धन व आपत्ती व्यवस्थापन हे ब्रीद घेऊन यंदाचे शिबिर ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत होत आहे.

सांगली  :  येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर कावजी खोतवाडी येथे उद्या पासून सुरू होत आहे. पर्यावरण संवर्धन व आपत्ती व्यवस्थापन हे ब्रीद घेऊन यंदाचे शिबिर ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत होत आहे.

शिबिराचे उद्‌घाटन सायंकाळी पाचला वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, एनएसएसचे विद्यापीठ संचालक प्रा. डॉ. अभय जायभाये, प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे, सरपंच संजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत होत आहे.  शिबिरादरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राउत,उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव सदिच्छा भेट देणार आहेत.

उद्या ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी शिबिरात मार्गदर्शन करतील. रविवारी  प्रा. मायाप्पा पाटील वाचाल तर वाचाल या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवारी जीवन कौशल्य व अध्यात्म या विषयावर ज्ञानेश्‍वर माने कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवारी  शशिकांत पाटील हे कला व जीवन या विषयावर मार्गदर्शन करतील. बुधवारी  प्रा. सदाशिव मोरे हे राष्ट्रीय सेवा योजनेत युवकांचे योगदान या विषयावर बोलतील. गुरुवारी योगाचार्य डॉ. अर्चना ऐनापुरे या आरोग्याचा पासवर्ड योगा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सातला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी सकाळी वसंतदादा पाटील शेतकरी शिक्षण मंडळाचे विश्‍वस्त अमित पाटील, गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष पी. एल. रजपूत, सचिव आदिनाथ मगदूम यांच्या उपस्थितीत समारोप होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News