पालकांनो, मुलांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्या.! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 January 2020

पालकांनी मुलांना छोट्या छोट्या सकारात्मक गोष्टी सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून मुलांचा आत्मविश्‍वास वाढेल.

मालाड : मुलांना त्यांच्या वयानुसार स्वातंत्र्य मिळायला हवे. अभ्यासाबरोबरच मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन शोभा नाखरे यांनी केले. मालाड, कुरार व्हिलेज येथील जिजामाता विद्यामंदिर शाळेत प्राथमिक विभागातर्फे ‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत पालकांसाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

‘मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांचा सहभाग’ या विषयावर बोलताना त्यानी मुलांच्या शारीरिक, मानसिक विकासाबद्दल मार्गदर्शन केले. पालकांनी मुलांना छोट्या छोट्या सकारात्मक गोष्टी सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून मुलांचा आत्मविश्‍वास वाढेल. स्वयंपाक घर उत्तम प्रयोगशाळा आहे. मुलांमध्ये घरकामाची आवड निर्माण झाल्यास त्यांच्या मेंदूला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच ‘सकाळ’चा बालमित्र अंक नियमित वाचण्याचे आवाहनही केले.

 कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलांना शिक्षण देणाऱ्या पालकांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष केशवराव भोसले, सचिव सचिन कदम, कोषाध्यक्षा रिनाताई सुर्वे, मुख्याध्यापिका करुणा नलवडे, ज्येष्ठ शिक्षिका मानसी वेदक, बालवाडी मुख्याध्यापिका प्राजक्ता आब्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन शीतल चव्हाण यांनी केले.

मुलांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्या! 

पालकांनी मुलांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली पाहिजेत. आदर्श पालक म्हणून मुलांवर आपले लक्ष असले पाहिजे. तसेच, आपल्या मुलांसोबत आपले चांगले नाते निर्माण व्हायला हवे, असे मार्गदर्शन शोभा नाखरे यांनी पालकांना केले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News